जुन्नर तालुक्यातील बौद्ध लेणी

सदरे

जुन्नर तालुक्यातील बुद्धलेण्यांनी जुन्नरच्या वैभवात विशेष भर घातली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यटन होण्यासाठी या बुद्धलेण्या केंद्रबिंदू ठरत आहेत. लेण्याकडे जाणारे मार्ग व्यवस्थित नसल्याने पर्यटकांना व अभ्यासकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जुन्नर तालुक्यातील या लेण्यांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करण्याची गरज प्रकर्षाने जाणवत आहे.

जुन्नर तालुक्यात मनमुकडा (मानमोडी) डोंगररांगेत भीमाशंकर लेणी समूह, अंबा अंबिका लेणी समूह आणि भूत लेणी समूह असे तीन लेण्यांचे गट आहेत. शिवनेरी किल्ल्यावरदेखील लेणी समूह आहेत. शिवनेरी लेणीवरील स्तूप सर्वाधिक उंच आहे. सोमतवाडीजवळील डोंगररांगेत तुळजा लेणी समूह आहे. कपीचीत (लेण्याद्री) डोंगरातदेखील मोठा लेणी समूह आहे. लेण्याद्रीजवळच असलेल्या डोंगरातदेखील सुलेमान लेणी समूह आहे. प्राचीन नाणे घाटातदेखील लेणी समूह आहे. या सर्व लेणी समूहांमध्ये सुमारे २५० ते ३०० लेण्या असून, वेगवेगळ्या प्रकारचे चैत्य स्तूपदेखील या लेण्यांमध्ये पाहायला मिळतात. या लेण्या पाहण्यासाठी लेणी अभ्यासक व विदेशी पर्यटक सातत्याने जुन्नर तालुक्यात येत आहेत.

Leave a Reply