स्तुतिपर लिखाण आत्मचरित्रात नको-रावसाहेब कसबे

बातम्या


‘अनेकदा आत्मकथनपर आणि चरित्रात्मक लेखनामध्ये आत्मस्तुतीपर लिखाण खूप असल्याने, अशा प्रकारच्या लेखनाला साहित्याचा दर्जा देऊच नये, या मताचा मी होतो. मात्र, वास्तववादी आत्मचरित्रे पाहिली तेव्हा ती साहित्याचाच एक प्रकार आहेत याची जाणीव झाली,’ असे मत ज्येष्ठ लेखक व प्रा. जवाहर मुथा -सोनग्रांचे महाविद्यालयीन मित्र डॉ. रावसाहेब कसबे यांनी ‘निहारा प्रकाशन’तर्फे प्रा. रतनलाल सोनग्रा लिखित ‘सोनचाफा’ या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन करताना केले. डॉ. कसबे व मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते या ग्रंथाचे प्रकाशन नुकतेच पुण्यात झाले, त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, ‘निहारा प्रकाशन’च्या डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. ‘आत्मचरित्रांमध्ये लेखकाकडून स्वतःचेच कौतुक अधिक होते. त्याला माझा विरोध आहे. मात्र, काही वास्तव दर्शन घडवणारी आत्मचरित्र पाहिली न की ती अधिक माणसांपर्यंत पोहोचायला हवी,’ असेही डॉ. कसबे यांनी नंतर आवर्जून सांगितले.
म. सा. प. चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, ‘कल्पकतेपेक्षा जीवनात वास्तवात काय घडते आहे, याची वाचकांना उत्सुकता असते. त्यामुळे चरित्रात्मक आणि आत्मकथनपर साहित्याला मोठी मागणी आहे.’ सोनग्रा यांनी आत्मकथनामागची भूमिका विशद केली. विजय कोलते यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply