डॉ. सुधा कांकरिया यांना ‘नोबेल पीस अवॉर्ड’साठी नामांकन

बातम्या

नोबेल पारितोषिकासाठी अहमदनगरच्या नेत्रतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सुधा कांकरिया यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारतातून ‘नोबेल पीस अवॉर्ड’साठी नामांकन मिळाले आहे. मानवतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून या पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे, अशी माहिती नॉर्वेजियन नोबेल संस्थेचे नोबेल पुरस्कारासाठी नामांकन करणारे अधिकृत सदस्य आणि शास्त्रज्ञ डॉ. सुधीर तारे यांनी दिली. कमिटीने त्यांच्या नावाचा स्वीकार केला आहे. अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यावेळी डॉ. सुद्धा कांकरिया म्हणाल्या, मी गेल्या ४० वर्षांपासून नेत्रसेवेच्या कार्याबरोबर ‘स्त्रीजन्माचे स्वागत करा’ चळवळीत सक्रिय आहे.

यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष डॉ. प्रकाश मराठे, महाराष्ट्र ऑफ्थेल्मिक सोसायटीचे माजी अध्यक्ष मधुसूदन झंवर व अ. भा. जैन महिला संघटनेच्या माजी अध्यक्ष विमल बाफना, जितो संघटनेचे विजयकांत भंडारी, राकेश साखला, प्रमोद जेजुरीकर, बालकल्याण समिती पुणेच्या अध्यक्ष डॉ. राणी खेडीकर, बीके त्रिवेणी, मंदा नाईक, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. वर्धमान कांकरिया, डॉ. श्रुतिका कांकरिया आदी उपस्थित होते.

Leave a Reply