मुलगी असेल तरच भविष्य उज्वल आहे ‘गोडूली आली घरा-तोच दिवाळी दसरा’ – डॉ. सुधा कांकरिया

अ.नगर – येथील सिव्हिल हॉस्पिटल मधील 45 नवजात मुली-गोडूलीचे स्वागत सन्मान झबल टोपड देऊन तर त्यांच्या मातांचा सन्मान पौष्टीक खारीक खोबर्‍याचे पॅकेट तसेच सन्मानपत्र देऊन करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ अहमदनगरच्या वतीने गोडूली आली घरा-तोच दिवाळी दसरा या अंतर्गत सिव्हिल हॉस्पिटल मधील 45 नवजात लेकींचा व आईचा अत्यंत भावस्पर्शी स्वागत-सन्मान करण्यात आला. अशी माहिती या […]

पुढे वाचा ...

इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सचे नवीन जागी स्थलांतर

दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), अहमदनगर स्थानिक केंद्र दिनांक १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिनाचे औचित्य साधून नगर-कल्याण रस्त्यावर स्वत:च्या जागेत स्थलांतरित झाले. गेल्या ३७ वर्षांपासून संस्थेचे कामकाज पाटबंधारे विभागातील इमारतीमधून चालत होते. कामकाजाच्या दृष्टीने स्वत:च्या इमारतीची आवश्यकता भासल्याने संस्थेने, संस्थेचे संस्थापक सदस्य कै. कृष्णकांत राजे यांनी नगर-कल्याण रस्त्यावर बक्षीसपत्र करून दिलेल्या ८०० चौ. मी. भूखंडावर, […]

पुढे वाचा ...

मी ,विंदा आणि कविता

लेखक: प्रा. जवाहर मुथा खरे म्हणजे थोर व्यक्ती किंवा थोर कवी यांच्याशी आपण कधी तुलना करू नये ,पण कधी कधी आपल्या जीवनामध्ये असे काही प्रसंग येत असतात की नकळत त्यांच्याशी तुलना आपल्या मनामध्ये येते. अशा तुलनेने आपण मोठे होऊ शकत नाही, ही गोष्ट जरी खरी असली तरी, समाधान एवढेच लाभते की,आपल्याही जीवनातील काही क्षण या […]

पुढे वाचा ...

डॉ. श्रीराम रानडे

सप्टेंबर महिना उद्या सरेल..या महिन्यातील 2 तारीख ही डॉ. श्रीराम रानडे यांचा स्मृतीदिन! 1967/68 मध्ये त्यांच्या एकषष्ठी निमित्त साधना साप्ताहिकात मी लिहिलेला लेख, मला आज सापडला.. तो येथे मुद्दाम देत आहे.. त्यावरून त्यांची महती,मौलिकता आणि मुमुक्षुतेचा प्रत्यय सहजपणे कळून यावा.. – प्रा. जवाहर मुथा(प्रथम प्रकाशन साधना साप्ताहिक,हिरवी मने १९६८) १९६७ ची सार्वत्रिक निवडणूक ! काँग्रेस […]

पुढे वाचा ...

पु. ल., माडगूळकर आणि मी

लेखक: प्रा. जवाहर मुथा डेक्कन जिमखानाच्या मागे असलेल्या टेनिस कोर्टवर मी माझी स्कूटर लावून फेरफटका मारीत होतो. वेळ सकाळची होती.. पहाट व सकाळ मधली.. फिरताना जाणवले की ,समोरून पु.ल .व ग.दि.माडगूळकर, दोघे संथगतीने येत आहेत.. ते दोन्ही जवळ येताच मी पुलंना नमस्कार केला.. त्यांनीही प्रतिसाद दिला ..ते थबकले..मी परिचय करून देत म्हणालो,..” येथे किर्लोस्कर मासिकात […]

पुढे वाचा ...

अण्णाभाऊ साठेंच्या आठवणी

लेखक – प्रा. जवाहर मुथा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती (1 आगस्ट) निमित्त १९६३ – ६४ चे ते वर्ष होते. शिरस्त्याप्रमाणे मी तात्यांकडे (डॉ. श्रीराम रानडे) संध्याकाळी गेलो होतो. खालच्या हॉलमध्ये तात्या रेलले होते. समोरच्या बाकावर काही ‘मंडळी’ बसली होती. धोतर, नेहरुशर्ट असा पेहराव केलेल्या व्यक्तींकडे पाहत, मी आत गेल्यावर, तात्या उद्‌गारले, ‘अण्णा, हा आमचा जवाहर’.अण्णाभाऊ […]

पुढे वाचा ...

प्रस्तावना – स्वप्न फुले ज्योतिबांचे

प्रस्तावनाराहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ स्थापन होऊन बारा वर्षे झालीत, ही गोष्टच अत्यंत तेजस्वी आहे. “तेजस्वी ” हा शब्द मी अनेक कारणासाठी वापरला आहे. कोणतीही संस्था दीर्घकालपर्यंत कार्यशील असते, यात त्या संस्थेची निकड व गरज, सामाजिकदृष्ट्या तर, महत्त्वाची असतेच, परंतु त्या संस्थेतील कार्याभोवती अनेक वर्षाच्या कार्याचे ‘तेज’ असते. याच दृष्टिने महात्मा फुले कृषी विद्यापीठ ही […]

पुढे वाचा ...

‘सरिता’

सरिता’ या मी व प्रा यशवंत भीमाले यांनी संपादीत केलेल्या पाठ्यपुस्तक (१९७२) याची मी दिलेली प्रस्तावना येथे आज २८जूलै रोजी ५३वी वर्षगाठ असल्यामुळे देत आहे.. दिवसेंदिवस मराठी कवितेचे स्वरूप बदलत आहे. हे स्वरूप अंतर्बाध बदलत आहे. आशयघनता आणि रचनासौंदर्य या दोन्ही बाबतीत आधुनिक मराठी कविता चिंतनशील झालेली वाटते. विषयांच्या चौकटी, अनुभूतींच्या प्रमाणात वाढतच आहेत. आविष्कारांमधील […]

पुढे वाचा ...

फादर फ्रान्सिस दिब्रिटो

साहित्यिक व पर्यावरणवादी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. मागील काही वर्षांपासून ते आजारी होते. वसईत त्यांनी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. फादर फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे धाराशीव (उस्मानाबाद) येथे पार पडलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. […]

पुढे वाचा ...

धम्मलिपी शब्दकोश : प्राकृत भाषेचा अमर कोश

– प्रा. जवाहर मुथा कोशवाङ्मय म्हणजे एकप्रकारे ज्ञानाचं आगार. एखाद्या भाषेत कोशवाङ्मय जेवढं अधिक, त्यावरून त्या भाषेची श्रीमंती ठरत असते. राज्यकारभार सुकर होण्यासाठी, जनसंपर्काच्या प्रस्थापनेसाठी आणि व्यवस्थापनाच्या सोयीसाठी स्थानिक भाषेचे ज्ञान व एकंदर जीवनव्यवहाराचे आकलन अत्यावश्यक होते. आपली भाषा टिकविण्याच्या दृष्टीने अभ्यासकांना भाषा व भूप्रदेश यांचे अधिकाधिक ज्ञान करून घेणे अपरिहार्य वाटत असते. त्या दृष्टीने त्यांनी जे […]

पुढे वाचा ...