सदाचार – उन्मती

सदरे

जच्या कलियुगात सदाचार शिकविणे म्हणजे चारा डेपोतील कचरा नीट करण्यासारखे आहे. कितीही साफ करा, पुन्हापुन्हा कचरा येतोच आहे. सदाचार शिकविल्याने येत नाही. त्यासाठी संस्काराचीच आवश्यकता आहे. घरातील संस्कार सदाचाराच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा भाग असतो.

तन्हा है चराग दूर परवाने हैं अपने थे जो कल, आज वो बेगाने हैं

नैरगि-ए-दुनिया को न पुछो क्या हुआ किस्से हैं, कहानियाँ हैं, अफसाने हैं.

दुनियेच्या जादूगिरीविषयी कोणीच बोलू शकत नाही. दीप शेवटी एकटाच जळत असतो आणि पतंग त्यापासून दूरच पळतात. या जगात अनेक प्रकारच्या कथा म्हणूनच आहेत ! सदाचार हा जेव्हा मानवी मनामनात भिनेल, तेव्हा दुराचार आपोआप दूर होऊन जाईल; परंतु तोपर्यंत तरी इतरांच्या कल्याणाचा हेतू धरूनच मानवाने सदोदित कार्य व व्यवसायही केला पाहिजे. इतरांचे भले कसे होईल, याचा विचार म्हणजेच सदाचार होय!

देह बुद्धिच्या अंती । सकळ एकाची प्राप्ती ।

एक ब्रह्म द्वितीय नास्ती। श्रुतीवचन ।।

सर्व संतांना त्रिकाल बाधित नैतिक मूल्यांचे ज्ञान समाजाला करून द्यायचे होते. कारण नैतिक मूल्यांचे विस्मरण जेव्हा समाजात होते, तेव्हा तो रसहीन व रसातळ गाठतो. म्हणूनच समाजातील प्रत्येक व्यक्तीने नैतिक मूल्यांचे जतन केले पाहिजे. सदाचार मग आपोआपच होतो.

प्रा. जवाहर मुथा

Leave a Reply