नगर | स्त्री सन्मानाची सुरुवात घरापासून व्हावी, तरच आपला देश सुरक्षित सक्षम आणि बलवान होईल. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्री प्रगती पथावर आहे. आजच्या स्त्रीने आत्मनिर्भर होऊन निर्भयपणे संकटाचा सामना करावा. भावी पिढी कशी घडवायची? ते महिलांच्या हातात असल्याचे प्रतिपादन सभापती पुष्पा बोरुडे यांनी केले. महिला आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी नगरसेविका बोरुडे बोलत होत्या. सावेडी, भुतकरवाडी येथे झालेल्या या कार्यक्रमासाठी स्त्री रोग तज्ञ डॉ. योगिता सत्रे, डॉ. रेश्मा शेख, दंतरोग तज्ञ डॉ. वर्षा शिंदे नागरदेवळे सरपंच सविता पानमळकर, उपसरपंच पौर्णिमा शेलार, समृद्धी संस्थेच्या अध्यक्षा स्वाती डोमकावळे आदी उपस्थित होत्या.