‘हिंद सेवा मंडळाला सर्वतोपरी सहकार्य करेन’-गणेश कवडे, मनपा स्थायी समिती अध्यक्ष

बातम्या

नगर शहरात हिंद सेवा मंडळाच्या सर्व शाळांचे शैक्षणिक कार्यात मोठे योगदान आहे. सर्वसामान्यांना शिक्षण देणारी दादा चौधरी विद्यालय व दादा चौधरी मराठी शाळा आहे. जी महाराष्ट्र दिन सर्वत्र आनंदाने हा साजरा होत आहे. नगरकरांसाठी व ऋणानुबंध असलेला हिंदसेवा मंडळाच्या कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेन, असे प्रतिपादन मनपाचे स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांनी यावेळी केले .
हिंद सेवा मंडळाच्या दादा चौधरी विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला . याप्रसंगी मनपा स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे व सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक प्रा. देविदास खामकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक ,ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा ,साहित्यिक प्रा. जवाहर मुथा, मेहेर उपस्थित होते. इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी, सहाय्यक सचिव बि.यु कुलकर्णी, भाई सथ्था नाईट हायस्कूलचे प्राचार्य सुनील सुसरे, दादा चौधरी विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर साबळे, दादा चौधरी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष येवले, पा.ड. क.वी.चे मुख्याध्यापिका रोहिणी फळे, मेहेर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. वर्षा कुलकर्णी आदी उपस्थित
प्रा. शिरीष मोडक म्हणाले, स्थायी समिती सभापती गणेश कवडे यांनी महानगरपालिकेच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी व कामगारांसाठी करून दिला. आपला दवाखाना सुरु केला आहे. अनेक विकासाची कामे करून नगर शहरात उत्कृष्ट कार्याचा ठसा श्री कवडे यांनी उमटवला आहे. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. अजित बोरा म्हणाले, सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. याप्रसंगी प्रा. देविदास खामकर व प्रा. जवाहर मुथा यांनी मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांचा परिचय प्राचार्य सुनील सुसरे यांनी सुखदेव नागरे यांनी प्रास्ताविकात महाराष्ट्र दिन कामगार दिनाची माहिती दिली.


साप्ता. नगरसंकेतचे तेहतिसाव्या वर्षी इंटरनेट माध्यमाचे प्रकाशन..

1 मे हा नगरसंकेतचा वर्धापनदिन ही होता..1992 मध्ये त्यावेळी भारताचे संरक्षण मंत्री ना. शरद पवार अहमदनगर यांनी येथे येऊन त्यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्यातील एकमेव सांस्कृतिक,साहित्यिक,शैक्षणिक साप्ताहिकाचे न्यूज पोर्टलचे उद्घाटन केले होते..या तेहतिसाव्या वर्धापनदिन निमित्ताने इंटरनेट च्या माध्यमातून जगभरात जाणार्या संपादीत केलेल्या अंकाचे प्रकाशन अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती चे अध्यक्ष श्री गणेश कवडे,हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा शिरीष मोडक, व सर्वांच्या उपस्थितित प्रकाशित केले गेले..

Leave a Reply