बाह्य आणि आंतरिक समग्रतेचा वैश्विक स्वरूपाचा काव्यात्म अर्थ शोधण्याकडे मराठी कविता आज वळलेली दिसत असताना पुणे-पिंपरीच्या नवोदित कवयित्री सीमा गांधी यांचा ” मनाचे सोहळे” हा काव्यसंग्रह त्यांनी मला आपल्या नगर मुक्कामी भेट दिला. काव्यात्म शोधातून स्वतःला वगळत, ही कविता प्रेम संवेदनशील,विरह वेदनेची, अशा परात्मतेची एक वस्तुनिष्ठ मांडणी करते,असे मला या कविता वाचताना जाणून येऊ लागले. उत्तरोत्तर ही कविता त्यांच्या कथनातून व्यक्तिगतता कमी करीत नसली तरी भावनेला आवाहन करू पहाते. तत्त्वज्ञानासारखी शुष्क भाषेचा वापर न करताही काव्यात्म भाषेच्या मदतीने कवीयित्रीने प्रेम विश्वाचे आकलन आणि त्यावर त्याचे भाष्य अधोरेखित करत जाते. त्यांना माझ्या अनेकानेक शुभेच्छा.