ज्योतिष नक्षत्र आणि योग

Uncategorized

आज एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती भगवती कृपेने लिखाण होत आहे. सनातन वैदिक ज्योतिष मध्ये पंचांगांमधील तिसऱ् अंग नक्षत्र बाबत खूप काही लिहिले गेले आहे. प्रत्येक कार्यास नक्षत्र सांगितले गेले आहे. इतकेच नव्हे तर महापुरुषांच्या जन्म तिथि सह नक्षत्रांचा सुद्धा योग महत्त्वाचा सांगितला गेला आहे. नरसिंह देवाचा अवतार सुद्धा वैशाख चतुर्दशीला शनिवारी स्वाती नक्षत्रात झाला. प्रभू रामचंद्र हे चैत्र शुल नवमीला पुनर्वसु नक्षत्रावरती अवतरीत झाले. भगवान कृष्ण अष्टमीला रोहिणी नक्षत्रावरती अवतरीत झाले. म्हणजेच तिथी वार आणि नक्षत्र यांचे सुद्धा सुयोग खूप प्रभावी असतात. त्यातील एक संयोग म्हणजे गुरुपुष्ययोग याबाबतीत संपूर्ण भारतभर एक वाक्यता आहे की गुरुपुष्य योग अत्यंत शुभ असतो.येत्या गुरुवारी म्हणजेच 27 एप्रिल 2023 ला या संवत्सरचे पहिला गुरुपुष्य अमृत योग निर्माण होत आहे. सकाळी 7 पासून पुढे अहोरात्र गुरुपुष्य योग आहे. पुष्य नक्षत्र च्या जोडीला काही वारांचे संयोग फार प्रभावी ठरतात. रवी पुष्य योग मंत्र सिद्धीला फार चांगला यावेळी वर्ष भरात एकूण पाच रविपुष्ययोग आहेत आणि दोन गुरुपुष्य योग आहेत. गुरुपुष्ययोग हा सर्व प्रकारच्या संपत्ती म्हणजे चल आणि अचल संपत्ती खरेदी करण्यासाठी चांगला. चल संपत्ती म्हणजे वाहन, जनावरे, सोने, चांदी, इतर मूल्यवान धातू आणि रत्ने खरेदी करण्यास उत्तम. याला कारण म्हणजे पुष्य नक्षत्र हे वृद्धी करणारे नक्षत्र आहे म्हणजे वाढवणारे नक्षत्र आहे. म्हणून पुष्य नक्षत्रावर  केलेले कोणतेही काम मग ती उपासना असो किंवा संपत्ती खरेदी असो ती वाढत राहते.  अचल संपत्ती म्हणजे घर,  जमीन  यासारख्या स्थिर असणाऱ्या संपत्ती. गुरुपुष्य योग वरती अशी अचल संपत्ती खरेदी केली तर ती वाढत राहणार.तसेच गुरुपुष्ययोग किंवा रवी पुष्य योग मध्ये महालक्ष्मी उपासना अत्यंत श्रेष्ठ सांगितले आहे. आपण आधी पुष्य नक्षत्र बाबत अधिक माहिती घेऊ त्यानंतर पुष्य नक्षत्र सह होणारे योगबाबत बोलू. पुष्य नक्षत्र हे 27 नक्षत्रांपैकी आठवे नक्षत्र आहे. पुष्य नक्षत्र हे मध्य नाडीचे मेष योनीचे देवगणी पिंपळवृक्ष आराध्य वृक्ष असलेले नक्षत्र आहे. दान मध्ये रक्त वस्त्रदान म्हणजेच लाल रंगाच्या वस्त्र चे दान या नक्षत्र साठी करण्यास सांगितलेले आहे. या नक्षत्राची देवता बृहस्पती आहे. हे नक्षत्र कर्क राशीत येते. कर्क राशीतच या नक्षत्राची चारही चरणे आहेत. या नक्षत्र चा प्रथम चरण चा स्वामी रवी हा ग्रह आहे द्वितीय चरण चा स्वामी बुध हा ग्रह आहे तृतीय चरण चा स्वामी शुक्र हा ग्रह आहे आणि चतुर्थीचारांचा स्वामी मंगळ हा ग्रह आहे. या नक्षत्र चे अधिपत्य शनी ग्रह कडे आहे. त्यामुळे मंगळवार आणि पुष्य नक्षत्र असताना चुकूनही कर्ज घेऊ नये. हे नक्षत्र ऊर्ध्वमुखी नक्षत्र आहे म्हणजेच या नक्षत्रावर आपण बी बियाणे पेरणी आणि इतरही जी उर्ध्वमुखी कामे आहेत. ती विशेषत्वाने करावी त्याशिवाय ही हे नक्षत्र धान्य संग्रह साठी ,औषध घेण्यासाठी , बाळंतिणीला देवदर्शनासाठी, कान टोचण्यासाठी, अन्नप्राशनसाठी, जावळ काढण्यासाठी, सोडमुंज करण्यासाठी, दत्तक विधान करण्यासाठी अशा अनेक काम साठी पुष्य हे नक्षत्र उत्तम आहे. पुष्य नक्षत्र शुक्रवारी असल्यास उत्पात योग समजला जातो. मंगळवारी पुष्य नक्षत्र असताना चुकूनही कर्ज घेऊ नये संपूर्ण जन्मात ते कर्ज फीटत नाही. शनिवारी पुष्य, अनुराधा ही नक्षत्रे असताना जर कोणी पिंपळवृक्ष लावले आणि पिंपळवृक्षची सेवा केली तर अत्यंत उत्तम फलप्रद ठरते. गर्भाधान करण्यासाठी अश्विनी, भरणी, पुष्य, आणि मघा नक्षत्र हे उत्तम आहे. पुष्य नक्षत्र वर विवाह मात्र पूर्ण तया वर्ज्य सांगितला आहे. पुष्य नक्षत्राच्या द्वितीय आणि तृतीय चरणात जन्म झाला असता जनन शांती सांगितलेली आहे. मला वाटते नक्षत्राची एवढी माहिती पुरेशी झाली. आता या गुरुपुष्य योगा वरती काय उपाय करावेत ज्यायोगे आपल्या संसारिक अडचणी दूर होतील याबाबतीत आपण बघू. 1)गुरुपुष्य योगावर पिंपळ वृक्षाची सेवा जास्तीत जास्त करावी. एकतर या नक्षत्राचा आराध्य वृक्षच पिंपळ आहे दुसरे शनी ग्रहाची प्रसन्नता पिंपळसेवा ने होते.2) त्याशिवाय शुद्ध देशी लाल गाईला गुळ आणि गोड चपाती खाऊ घालावी. यामुळे तुमचा मान सन्मानची वृद्धी होते3) तसेच गुरुपुष्य योगा वरती माता महालक्ष्मीला खीर चा नैवेद्य दाखवावा नाहीतर एखादी पांढरी मिठाई चा नैवेद्य दाखवावा तसेच पांढरे कमळ जरूर चढवावे 4)ज्याला शक्य असेल शास्त्र शुद्ध रीतीने जो श्रीयंत्र पूजन करू शकतो त्याने श्री यंत्र स्थापना सुद्धा करायला हरकत नाही 5)गुरुपुष्य योग वर उजवा शंख ची घरात स्थापना केली आणि तीही त्या शंख वरती लक्ष्मी बीज म्हणून लिहून केली तर भरपूर धनप्राप्ती होते6) तसेच गुरुपुष्य योगावर घरच्या मुख्य द्वार वरती स्वस्तिक चिन्ह बनवून अंगणात रांगोळी काढल्याने महालक्ष्मीचे प्रसन्नता होते.7) गुरुपुष्य योगावरती संपूर्ण शिव परिवार म्हणजे शिव पार्वती कार्तिकेय गणेश नंदी या सर्वांची पूजा करणे खूप शुभ राहते 8) शिवलिंग आणि शिवपूजन झाल्यावर थोडेसे रक्तचंदन पिवळ्या कापडात बांधून स्वतःजवळ ठेवल्याने होणारा वायफट खर्च थांबतो.9) गुरुपुष्य योग वर थोडे पाणी आणि दूध एकत्र करून त्यात थोडी हळदी आणि थोडे पिवळे चंदन घालून ते पिंपळवृक्षाला सूर्यास्ताच्या किंचित आधी अर्पण केल्यास चांगले फळ मिळतात. 10)दीपावलीच्या आधी सुद्धा पुष्य नक्षत्र येत असतोच त्यावेळी व्यापारी वर्गाने अवश्य त्यांच्या अकाउंट च्या वह्या खरेदी कराव्यात.11) मुहूर्त चिंतामणी या ग्रंथात रोहिणी पुनर्वसू आणि पुष्य या तीन नक्षत्रामध्ये सुवासिनी स्त्रीने नवीन बनविलेले सोन्याचे दागिने आणि नवीन वस्त्र धारण करू नये तुम्ही सोने आणि नवीन वस्त्र विकत घेऊ शकता पण त्याच दिवशी धारण करू नये.12) पुष्य नक्षत्राला ब्रह्मदेवाच्या श्रापमुळे विवाहासाठी वर्ग मानले गेले आहे पण पुष्य नक्षत्र हे अत्यंत सात्विक नक्षत्र व शनीचे नक्षत्र असल्यामुळे या दिवशी दारू पिणे कटाक्षाने टाळावे खरे तर दारू कोणत्याच नक्षत्रावरती कोणत्याच वारी पिऊ नये पण त्यातल्या त्यातही शनिवार रविवार तसेच असे मोठे योग पर्व या दिवशी नक्कीच धर्मशास्त्र विरुद्ध गोष्टी टाळाव्यात. 13)यावेळी 27 एप्रिल 2023 ला गुरुपुष्य योग असतानाच काही पंचांग अनुसार मेष राशीत प्रवेश केलेला गुरु उदित होतोय. राजस्थानचा काही पंचांग मध्ये 30 एप्रिलला गुरुचा उदय दाखवला आहे. गुरु उदय बाबत मतभेद तर आहेत पण आपण 27 एप्रिल ला गुरु उदय होतोय असेच समजून त्यादिवशी लक्ष्मीनारायण पूजन केल्याने गुरु ग्रहाची प्रसन्नता होईल14) तसेच लक्ष्मीनारायण मंदिरात किंवा त्यांच्या फोटोसमोर शुद्ध तुपाचा दिवा लावून विष्णुसहस्रनाम चे पठण अत्यंत लाभप्रद राहील त्यामुळे प्रगतीतील अडथळे दूर होतील.15) या गुरू पुष्य योग वरती आपल्या गुरूंना मग ते शाळेतील शिक्षक असो किंवा अध्यात्मातील गुरु असतो यांना आदरपूर्वक वस्त्र फळे इत्यादी गोष्टींची भेट दिली तर कुंडलीतील गुरु ग्रह जास्त चांगले फळ देईल 16)जर विवाह संबंधात अडचणी असतील तर केळ्याच्या झाडाची मुळी गुरूचा होरा असताना गुरू पुष्य योग वरती पिवळ्या कापडात बांधून पुरुषांनी उजव्या दंडावरती आणि स्त्रियांनी डाव्या दंडावर बांधली तर नक्कीच काही शुभ गोष्टी घडतील 17)गुरु हा ग्रह कुंडलि मध्ये अनेक गोष्टींकरिता कारक असतो. विवाह साठी गुरू बल आवश्यकच आहे. शिक्षणासाठी गुरुबल आवश्यकच आहे. तसेच गुरुचे एक नाव जीव असल्यामुळे माणसाला आयु आणि आरोग्य साठी गुरू बल आवश्यकच आहे. असा गुरु ग्रहाचे बळ मिळवण्यासाठी शिवलिंगावर एक मुठी भिजवलेली चण्याची डाळ चढवल्याने भगवान शिव ची कृपा होते 18)त्याशिवाय अजून एक उपाय अगदी अवश्य करावा या गुरुपुष्य चे योग पर सुरुवात करून अकरा गुरुवारपर्यंत भगवान विष्णूंना हळदीचा टिळा लावून उरलेले हळदी चा टिळा कपाळावर लावल्याने नक्कीच आर्थिक संकट दूर होते. मला अनेक मेसेज काही काळ पूर्वी आलेले आहेत की ज्यांनी अगदी श्रद्धेने नियमाने गूरुपुष्य योग वर 27 वेळा महालक्ष्मी अष्टकचे पाठ सुरू करून ते पुढील पुष्य नक्षत्र पर्यंत चालू ठेवले त्यांचा अनेक अडचणी दूर झालेल्या आहेत. स्त्रियांनी मासिक धर्म मध्ये फक्त चार दिवस पाठ करू नये इतर वेळी पाठ करावे पुरुषांनी मात्र एकही दिवस खंड न पडू देता पाठ करावेत एक वेळ, एक आसन ,एक जागा ठेवल्यास उत्तम पण काही कारणांनी ठराविक वेळी ठराविक जागेत करता नाही आलं परगावी जावं लागलं पुरुषांनाही स्त्रियांनाही तरीही त्यांनी परगावी सुद्धा अगदी अवश्य 27 वेळा महालक्ष्मी अष्टक नियमाने श्रध्देने करावे आणि चार सहा महिन्यातच चमत्कार बघावा. गुरुपुष्य योगावर ओरिजनल हत्ता जोडी ही वनस्पती मिळाली तर तिला शुद्ध सिंदूर भरलेल्या चांदीचा डबी मध्ये ठेवून पूजा करावी. त्यानंतर दररोज धूप दीप दाखवणे आणि दर पुष्य नक्षत्रावर त्या चांदीच्या डबीत सिंदूर चढवणे या वनस्पतीने लक्ष्मी प्राप्ती मध्ये मदत होते. ओरिजनल हत्ता जोडी मिळणे शक्य नसेल तर त्या व्यक्तींनी शंखपुष्पी ची मुळी एखाद्या चांदीचा डबीत ठेवावी. त्याने सुद्धा नक्कीच पैशाच्या आवक मध्ये फरक पडतो. शंखपुष्पीची मुळी जडीबुटींच्या दुकानात मिळते. गुरुपुष्य नक्षत्र वरती वरील दोन्ही गोष्टी शक्य नाहीत त्यांनी वडाच्या झाडाचे पान आणून त्यावरती हळदीने स्वस्तिक करून ते पान चांदीच्या डबीत ठेवून घरात ठेवल्याने घरात लक्ष्मीचे आगमन होते. गुरुपुष्य योगचे बरेच प्रयोग आहेत. जी लोकं नियम निष्ठेने श्रद्धापूर्वक विश्वासाने सगळे नियम पाळून साधना करतात आणि सबुरी ठेवतात त्यांच्यावरती जगदंबा नक्कीच कृपा करते. गुरु पुष्य योग वरती एका आसन वरती बसून श्री गजानन विजय ग्रंथ चे पारायण करतात त्यांना गजानन बाबा अत्यंत मोठ्या संकटातून ही सोडवतात. पण पोथी मात्र शेगाव गजानन मठाद्वारे प्रकाशित हवी. असो लेख खूपच मोठा झाला. हार्दिक क्षमस्व.

भरत सोलापूर

Leave a Reply