९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला होणार

बातम्या

पुणे : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी महामंडळातर्फे स्थळनिवड समिती गठित करण्यात आली होती. या समितीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्वला मेहेंदळे, साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. रमेश वंसकर, श्री. प्रदीप दाते, डॉ. किरण सगर, सुनिताराजे पवार आणि डॉ. नरेंद्र पाठक हे सहभागी झाले होते.
या समितीने औदुंबर आणि अमळनेर या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आणि सातारा येथील संस्थेचे दृक्-श्राव्य सादरीकरण पाहिले आणि तीनही संस्थांची संमेलन आयोजनाची तयारी व कार्यक्षमता यांचा विचार करून स्थळनिवड समितीने सर्वानुमते मराठी वाङमय मंडळ, अमळनेर या संस्थेची शिफारस केली आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्याला मान्यता दिली.

पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेत, महामंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा तांबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस समिती सदस्यांव्यतिरिक्त श्री. प्रकाश पागे. प्रा. मिलिंद जोशी, जे. जे. कुलकर्णी, दादा गोरे, दगडू लोमटे, डॉ. विद्या देवधर, अ. के. आकरे व प्रकाश गर्गे हे सदस्य उपस्थित होते.

डॉ. उज्ज्वला मेहेंदळे कार्यवाह, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ यांनी आज पत्रक प्रसिद्ध केले.

Leave a Reply