सोनजातक या आत्मकथेचे 14 भागांचे प्रकाशन संपन्न

बातम्या

प्रा. रतनलाल सोनग्रा यांच्या साहित्य, विषयक व वैचारिक उंची व सामाजिक कार्याचे मुल्यमापन असलेले सर्व पुस्तके अभ्यासकांनी वाचनीय असेच आहेत. आज वैचारिक दुरावा वाढत आहे, अशा परिस्थिती पुस्तके, कथा, साहित्य, आत्मचरित्र यातून विचारांची देवाण-घेवाण होऊन जीवनाला दिशा मिळण्याचे काम होत असते. रतनलाल सोनग्रा यांनी देशभर फिरुन अनेक ग्रंथ, कादंबर्‍या, शासकीय पाठ्य पुस्तकातही त्यांचे विचार पोहचविण्याचे काम केले आहे. आज प्रकाशित होत असलेल्या 14 भागातील आत्मचरित्रातून जीवन संघर्षाचे लेखन यात केले आहे. हा अनमोल असा ठेवा आहे, तो सर्वांना कायम मार्गदर्शक राहील, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जवाहर मुथा यांनी काढले.

     थोर विचारंत साहित्यिक तसेच महाराष्ट्र शासनाच्या साहित्य संस्कृती महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. रतनलाल सोनग्रा त्यांच्या जीवन प्रवासातील ‘सोनजातक’ या आत्मकथेच्या चौदा भागांचा प्रकाशन सोहळा येथील माऊली संकुल सभागृहात मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी प्रा.जवाहर मुथा होते.  कार्यक्रमास माधवराव गायकवाड, जयंत येलुलकर, सुनिल गोसावी,  प्रेमसुख सोनग्रा, वसंत विटणकर, ल. ना. रोहिनाल, स्वाती सामल, स्नेहसुधा कुलकर्णी, सुभाष सोनवणे, अरुणा गोयल आदी उपस्थित होते.

     आर. के. प्रकाशन, विचार प्रकाशन-पुणे आणि प्रबोधन फौंडेशनच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी फौंडेशनचे परिमल निकम यांनी सर्वांचे स्वागत केले. 

     ‘सोनाजातक’ च्या 14 भागांची समर्पणभाव कथन करतांना रतनलाल सोनग्रा म्हणाले, एकूण 14 भागात हे आत्मचरित्र लिहिले असून, सोनजातक मित्र जातक, विद्या जातक, लोक जातक, सेवा जातक, सार्थ जातक, मित्र जातक, कला जातक, भिम जातक, फुले जातक, ज्ञान जातक, तुका जातक, मुक्ता जातक, बुद्ध जातक अशा चौदा प्रकारच्या जन्मदहस्य व विचार प्रवण ही जातके समाजातील विचार प्रबुद्ध ऋषितुल्य महनिय 14 व्यक्तींना समर्पित करण्यात आले आहेत.

     निहार प्रकाशन पुणे यांच्या स्नेहसुधा कुलकर्णी यांनी प्रा. रतनलाल सोनग्रा यांच्या 75 विचार पुस्तकांचे प्रकाशन केले आहे.

     या कार्यक्रमप्रसंगी ‘प्रबुद्ध नायक’ साहित्य सन्मान पुरस्काराने बहुजन चळवळीतील कार्यकर्ते व राष्ट्र सेवा दल कलापथाचे शाहीर अरुण आहेर यांनी लिहून संपादित केलेल्या ‘कला साधकांचा नगरी आहेर’ या ग्रंथ व साहित्य कृती निर्माण कार्यासाठी त्यांना ‘प्रबुद्ध नायक’ साहित्य सन्मान देवून सन्मानीत करण्यात आले.

     धम्मचक्र प्रवर्तन दिन ‘मैत्रेय बुद्ध’ या विषयावर आचार्य रतनलाल सोनग्रा यांचे विचार प्रणव व्याख्यान झाले. प्रबोधन फाऊंडेशनच्यावतीने रतनलाल सोनग्रा यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. सूत्रसंचालन शर्मिला गोसावी यांनी केले तर कवी सुभाष सोनवणे यांनी आभार  मानले.

     कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्वागताध्यक्ष संजय खामकर, सुभाष सोनवणे यांनी परिश्रम घेतले. यावेळी  रोहिणी आहेर, प्राचार्य खासेराव शितोळे, चंद्रकांत पालवे, ज्ञानदेव पांडूळे, सुरेखा आडम, गोविंद आडम, नंदकुमार आढाव, चंद्रकात पंडित, प्राचार्य सुधाकर शिंदे, बापू जोशी, दिपक रोकडे आदिंसह साहित्यीक उपस्थित होते.

Leave a Reply