सरगमप्रेमी मंडळाचा संगीत महोत्सव संपन्न

बातम्या

सरगमप्रेमी मित्र मंडळाच्या सरगम संगीत महोत्सवाच्या दोन दिवस चालेल्या संगीत महोत्सवात दिग्गज कलाकारांनी यावेळी हजेरी लावली. त्यांच्या बहारदार गायन, वादन, नृत्य व जुगलबंदीने नगरकर अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. उपस्थित रसिकांनी कलाकारांच्या सादरीकरणास टाळ्यांच्या कडकडाट करून स्टैंडिंग ऑनर देवून सन्मान दिला.

सरगम संगीत महोत्सवाची सुरवात किराणा घराण्याच्या सुप्रसिद्ध गायिका विदुषी सुजाता गुरव ( धारवाड) यांच्या तरल व लयदार शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने झाली. त्यांनी राग नंदच्या ‘ढूंडो बारे सैय्या’ या बंदिशीने सुरवात केली. त्यानंतर मध्य त्रितालात आजहू न आये मोरे शाम.., लागी

मोरी नैना… ही केरवा तालातील ठुमरी, युवती मना दारुण रण… हे नाट्यपद व दूत एकतालातील भाग्यदा मन मोहून टाकले. लक्ष्मी बारम्मा… हे कानडी भजन सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. द्वितीय सत्रा मध्ये धारवाड घराण्याचे सुप्रसिद्ध सतारवादक उस्ताद शफीक खान यांचे बहारदार सतार वादन झाले. त्यांनी सतारीवर राग बागेश्री मध्ये आलाप, जोड, झाला, द्रुत बंदिशी तसेच मिश्र धून व भैरवी सादर केली. उस्ताद शफीक खान यांच्या सतार वादनावर खुश होत रसिकांनी ‘वा उस्ताद वा…’ अशी दाद दिली. विदुषी सुजाता गुरव यांच्या शास्त्रीय गायनास व उस्ताद शफीक खान यांच्या वादनास तितक्याच तोलामोलाची तबल्याची साथ पुणे येथील तबला वादक पांडुरंग पवार यांनी केली. तर संवादिनीवर नगरच्या अंगद गायकवाड यांनी उत्कृष्ट साथ सांगत केली. तसेच अनुजा कुलकर्णी व अमृता बेडेकर यांनी तानपुऱ्याची साथ दिली. सरगम संगीत महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रथम सत्रामध्ये

जगप्रसिद्ध बासरी वादक पं.राकेश चौरसिया यांचे मधुर बासरी वादन झाले. त्यांना तबल्यावर प्रसिद्ध तबला वादक पद्मश्री पं. विजय घाटे यांनी अप्रतिम साथ दिली. त्यांच्यात झालेली बासरी व तबल्याची जुगलबंदी यावेळी रंगली. जसे बासरीचे स्वर निघायचे तसेच तबल्यावर बोल वाजवले जात होते. यावेळी पं. राकेश चौरसिया यांनी बासरीवर राग पुरिया कल्याण, राग बिहाग मध्ये रचना व पहाडी धून सादर करून रसिकांचे

महोत्सवाच्या अखेरच्या सत्रामध्ये पद्मश्री पं. विजय घाटे यांच्या संकल्पनेतून मेलोडिक न्हिदम’ अंतर्गत तालचक्र’ आविष्कार सादर करण्यात आला. यामध्ये तबला, हामोनियम वादन, गायन व कथक नृत्याचा अनोखा मिलाफ सादर करण्यात आला. तालचक्र’ आविष्कारात पद्मश्री पं. विजय घाटे यांनी तबला, नृत्यांगना शीतल कोलवालकर यांनी कथक नृत्य, शिखरनाद कुरेशी यांनी जंबे वाद्य प्रकार, अभिषेक सिनकर यांनी संवादिनी, सुरंजन खंडाळकर व सागर पटोकर यांनी गायनातून एकत्रित आपली कला सादर केली. त्यास उपस्थित रसिकांनी भरभरून दाद दिली. या आविष्कारात सर्व कलाकारांनी गणेश वंदना, तेजोमय नादब्रह्म हे… व अवघे गर्जे पंढरपूर ही भैरवी सादर केली. त्याचवेळी नृत्यांगना शीतल कोलवालकर यांनी त्यास अनुरूप कथक प्रकार सादर केला…

Leave a Reply