सूर्यग्रहण 2023

ज्योतिष पत्रिका
सूर्यग्रहण तारीख व वेळ
सूर्यग्रहण – 20 एप्रिल 2023
सूर्यग्रहण सुरू होते – सकाळी 07:05 पासून
ग्रहणाचा खग्रास -08:07 वाजता असेल आणि सूर्यग्रहणाचा मध्यभाग सकाळी 09:45 पर्यंत असेल.
ग्रहण संपेल – दुपारी १२:२९ वाजता
सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी 05 तास 24 मिनिटे

या महिन्यात २० एप्रिल रोजी होणारे सूर्य ग्रहण काही देशांमध्येच दिसणार आहे. परंतु वर्ष 2023 चे पहिले ग्रहण दक्षिण पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, हिंद महासागर आणि अंटार्क्टिकासह अनेक देशांमध्ये दिसणार आहे.

हे सूर्यग्रहण ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंडोनेशिया, मलेशिया, जकार्ता, फिलीपिन्स आणि दक्षिण जपानच्या काही भागातूनही दिसणार आहे, परंतु दक्षिण पॅसिफिक, कंबोडिया, चीन, अमेरिका, सिंगापूर, थायलंड, अंटार्क्टिका,भारत या भागातून ते दिसणार नाही.

वृषभ, मिथुन, धनु आणि मीन राशीच्या लोकांवर चांगला सकारात्मक परिणाम होणार आहे. आर्थिक लाभ, पदोन्नती आणि नोकरीत यश मिळू शकते असे ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहे.

कन्या राशीच्या लोकांवर देखील या प्रभाव दिसून येणार आहे. कन्या राशीच्या लोकांनी वाहन चालवताना काळजी घ्यावी. यामुळे मानसिक तणाव आणि वेदना देखील होऊ शकतात.

तूळ राशींच्या लोकांवर देखील या सूर्यग्रहणाचा नकारात्मक प्रभाव होऊ शकतो. तूळ राशीच्या लोकांना धनहानी होण्याची शक्यता आहे. पैसे वाचवण्याचा प्रयत्न करा. कुटुंबात वादाची परिस्थिती टाळा आणि आरोग्याची काळजी घ्या.

Leave a Reply