प्रा. डॉ. विकास खिलारे -यांचे कडून
ज्योतिषभूषण पुरस्कार

बातम्या

संजीवनी ज्योतिष ज्ञान प्रसारक मंडळ, साताराचे
संस्थापक अध्यक्ष ज्योतिषाचार्य प्रा. डॉ. विकास खिलारे -यांचे कडून
ज्योतिषभूषण पुरस्कार
प्रा. श्री. जवाहरलाल मुथा, यांना
मानपत्र अर्पण करून आज देत आहोत..
छत्रपती शिवरायांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सातारा नगरीतील संजीवनी ज्योतिष ज्ञान प्रसारक मंडळ, सातारा या संस्थेने आजपर्यंत अनेक गुणवंतांचे सन्मान केले आहेत. हिच सन्मानाची परंपरा याही वर्षी चालु ठेवत, आपणासारख्या ज्ञानी क्रियाशील व प्रतिभावत व्यक्तिमत्वाला ‘ज्योतिषभूषण’ या पुरस्काराने सन्मानित करताना आम्हास अत्यंत आनंद होत आहे.
आपण गेल्या तीन तपाहून अधिक काळ अध्यापन, पत्रकारीता साहित्यनिर्मिती, सामाजिक कार्य व ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसारा मध्ये कटिबध्द आहात. ‘ज्योतिष पत्रिका’ व ‘साप्ताहिक नगर संकेत घे संपादकपद आपण भूषवित असून मुक्त पत्रकार म्हणून वावरत आहांत. आपल्या ‘भविष्यवेध’ या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट ‘वाडमय निर्मिती’ चा पुरस्कार व अन्यही बरेच पुरस्कार आपणास मिळाले आहेत पुणे येथील वराहमिहीर मुक्त विद्यापीठाचे कुलगुरूपद आपण भूषविले आहेत. तसेच नगर, धुळे, मुंबई, दिल्ली येथील विविध सामाजिक संघटनांवरती कार्यकारी सदस्य, सचिव, अध्यक्ष अशा पदांवरून कार्य केले आहे. किर्लोस्कर, आचार्य रजनीश यांच्या ‘क्रांतीबीज’ या पुस्तकांचे अनुवाद लेखन आपण केले आहे.
सकाळ, लोकसत्ता, केसरी, महाराष्ट्र टाईम्स इ. दर्जेदार वृत्तपत्रातून आपले विविध विषयावर असंख्य वैचारिक लेख व कविता प्रकाशित झाल्या आहेत. विशेष म्हणजे बाबा आमटे यांच्या ‘ज्वाला आणि फुले’ या काव्यसंग्रहाचा तसेच
भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल तसेच महाराष्ट्र शासन यांनी वेळोवेळी आपल्या कार्याचा गुणगौरव केला आहे. महाराष्ट्राचा सुपुत्र हिंदी रत्न, ज्योतिर्विभूषण अशा अनेक पुरस्कारांनी आजपर्यंत आपणास सन्मानित केले गेले आहे. आजमितीस आपण साहित्य, कला व ज्योतिषशास्त्राद्वारे देशात व परदेशात समाजाच्या उन्नतीसाठी
कार्यरत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आपली या क्षेत्रातील निःस्पृह आणि निरलस सेवा पाहून आपल्या कार्याचा गौरव म्हणून ज्योतिषशास्त्रात प्रतिष्ठीत असलेला ज्योतिषभूषण हा पुरस्कार आमच्या संस्थेकडून यावर्षी आम्ही आपणास देत आहोत. ज्योतिषशास्त्रावरील प्रेम उत्तरोत्तर वाढत राहावे आणि त्यातून शास्त्राची सेवा घडत राहावी, ही सदिच्छा तसेच आपणास भावी आयुष्यात उत्तम प्रकारचे आरोग्य, यश, किती व उदंड आयुष्य लाभो व आपणाकडून असेष ज्योतिषशास्त्रासाठी भरीव कार्य होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…..

मा. आ. श्री. छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले
अधिवेशन अध्यक्ष मा. श्री. नंदकिशोर जकातदार
प्रमुख उपस्थिती मा. अॅड. मालती शर्मा
रविवार दिनांक 25/12/2022

Leave a Reply