जिल्हा वाचनालयाचे लवकरच सावेडीत सुसज्ज ग्रंथालय – राठोड

बातम्या

अहमदनगर । वाचनाचा वसा घेऊन | द्विशतकाकडे वाटचाल करणाऱ्या ऐतिहासिक जिल्हा वाचनालयाचे सावेडीत लवकरच स्वतःचे सुसज्य ग्रंथालय उभे राहणार असल्याचे माहिती प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड यांनी दिली. गुढीपाडव्याचे औचित्य साधून गंगा | उद्यानाजवळ जिल्हा वाचनालयाच्या स्वतःच्या जागेत उभारण्यात येणाऱ्या सुसज्य ग्रंथालयाच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन विक्रम राठोड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अध्यक्ष प्रा. शिरिष मोडक, प्रा. मेधा काळे, खजिनदार तन्वीर खान, शिल्प रसाळ, प्रा. ज्योती कुलकर्णी, प्रा. आर. जी. कुलकर्णी, नगरसेवक अजिंक्य बोरकर, संचालक वैद्य राजा ठाकूर, राहुल तांबोळी, कवी चंद्रकांत पालवे, इंजि. रविंद्र थिगळे, ग्रंथपाल अमोल इथापे, सहा. ग्रंथपाल नितीन भारताल आदि उपस्थित होते.

प्रा. शिरिष मोडक अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, जिल्हा वाचनालयाच्या वाटचालीत सावेडीतील सुसज्य ग्रंथालय हे अनेक वर्षांचे स्वप्न आज साकारण्यास सुरुवात झाल्याचा मनःस्वी आनंद आहे. सर्व संचालक मंडळ, वाचनालयाचे हितचिंतक व रसिक वाचक नगरकर यामुळे हे भव्य ग्रंथालय उभे राहिल्याने हा वारसा पुढच्या असंख्य पिढीपर्यंत चालणार असल्याचे समाधान असल्याचे सांगितले.

प्रा. ज्योती कुलकर्णी या ग्रंथालयाच्या | इमारतीबद्दल माहिती देताना म्हणल्या, सावेडीतील असंख्य वाचकांची गरज ओळखून उभारण्यात येत असलेले हे ग्रंथालय २२५० स्क्वे.फूट इतके भव्य असून, यात अनेक दालने असणार आहेत. दि. ५ | सप्टेंबर २०२३ पर्यंत हे वाचनालय सुरू करण्याचा सर्व संचालकांचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांचा सन्मान प्रा. मोडक यांनी केला. सूत्रसंचालन शिल्पा रसाळ यांनी केले.

Leave a Reply