प्रयत्नांची पराकाष्ठा ही माझी प्रार्थना आहे !

लेख


समर्पित जीवनाची एक अलौकिक गाथा शास्त्रीजींच्या आत्मसर्पणाने समाप्त झाली.
१९५७ चा तो काळ होता. निवडणुकीकरिता कोणाला उभे करावयाचे याचा विचार दिल्लीमध्ये जोरात चालू होता. त्या विषयी ठाम निर्णय घेण्याकरिता अखिल भारतिय कांग्रेस कमेटीच्या ऑफिसमध्ये रात्रंदिवस बैठका भरविल्या जात होत्या, लालबहादूर शास्त्रींचे ज्येष्ठ स्नेही व हिंदीचे ख्यातनाम साहित्यिक श्री. सुमंगल प्रकाश त्यावेळी दिल्लीमध्ये होते. एके दिवशी त्यांनी पाहिले की पंडित नेहरुच्या खोलीजवळ फार गर्दी जमा झाली असून प्रत्येक जण कान टवकारून आतल्या खोलीतला आवाज ऐकत होता. प्रकाशजीना हे काय चालले आहे ते कळेना ! त्यांची उत्सुकता जागृत झाली. तेही घोळक्यात सामील झाले. प्रकाशज ती आठवण लिहिताना म्हणतान, ” शास्त्री जी त्यावेळी अलाहाबादला गेले होते. पं. नेहरु इंदिरेच्या सहाय्याने टेलिफोनवरून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होते. पंडितजी इंदिरेच्याजवळ उभे होते आणि शास्त्रींशी काय बोलायचे ते तिला सांगत होते. परंतु इंदिराजींना आपल्या पित्याचे बोलणे समजत नसावेसे दिसले कारण पंडीतजींनी स्वतःच टेलीफोन आपल्या हाती घेतला होता. एक तर पंडितजी टलिफोनवर सहसा बोलत नसत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते टेलिफोनवर बोलताना आम्हाला क्वचितच दिसत .परत ते लालबहादूर शास्त्रींबरोबर बोलत होते ! बोलत असतान’च टेलिफोनमध्ये काहीतरी खराबी झाली वाटते ! कारण पंडितजी पुन्हा पुन्हा म्हणत होते, ‘लालबहादूर, लालबहादूर ऐकलेस ना तू ! तुला ऐकू येतय् ना ! लालबहादूर लालवहादूर !”
प्रकाशजींच्या मनावर या आवाजाने फारच मोहिनी घातली आपल्या जिवलग स्नेह्यांशी पडितजीचे ते मधूर बोलणे त्यांना अमृतासारखे वाटले.
आणखी अशाच एका प्रसंगाची सुमंगल प्रकाशजीनी आठवण करून दिली. एकदा वर्किंग कमेटीची सभा होती. शास्त्रीजी वगैरे सर्व नेते अगोदरच आले होते. नेहरूंच्यासाठी मुद्दाम मोठो खुर्ची आणून ठेवली होती. नेहरू येण्यापूर्वी प्राथमिक चर्चेला सुरुवात झाली. इतक्यात पंडितजी आले. ते आले आणि सरळ लालबहादूर जेथे बसले होते तिकडे वळाले लालबहादूर शास्त्रींनी ओळखले की जर आपण उठलो नाही तर पंडितजी नक्कीच आपल्या शेजारी येऊन बसतोल, आणि मग इतरांना कुचंवणा होईल. ते चटदिशी उठले आणि पंडितजीसाठी खास ठेवलेल्या खुर्चिकडे बोट करीत म्हणाले, आप इधर आईये ‘ पंडितजींनी क्षणभर त्या खुर्चीकडे पाहिले आणि चटदिशी शास्त्रीकडे वळून म्हणाले, ‘उसपर तुम बैठो उंचाईपर बैठनेकी तो तुम्हे जरूरत है’ पडितजींच्या या मार्मिक व प्रेमळ विनोदावर सर्वचजण हसले .शास्त्रीजींनी सुद्धा आपल्या उंची वर केलेल्या पंडतजीच्या या विनोदाला गालातल्या गालात हसून प्रतिसाद दिला.
शास्त्रींचे व्यक्तिमत्व कार्यप्रणालीच्या दृष्टाने असामान्य होते हा छोटा माणूस गगनउंचीचे काम करील, असे कोणालाहा ते पंतप्रधान होतांना वाटले नव्हते. अवध्या दिडवर्षाची आपली पंतप्रधानाची कारकिर्द शास्त्रीजींनी इतक्या चोखपणे बजावली होती की भारतातीलच नव्हे तर परदेशातीलहि सामान्य माणसे त्याऔच्याविषय आदराने व विश्वासाने बोलू लागली होते.
कै. पं.नेहरुचा दृष्टिकोण जितका जागतिक होता तितकाच शास्त्रींचा राष्ट्रीय होता. निःस्वार्थीपणा त्याच्या पाचवीसच पुजला होता .इतक्या मोठ्या माणसाला अनेक कंपन्यांचे शेअर्स सहज विकत घेता आले असते. अनेक मोठमोठे कारखाने आपल्या मुलांकरवी त्याना सहज काढता आले असते. प्रतापसिंग कैरॉ, टी. टी. कृष्णम्माचारी, किंवा मोरारजी देसाईनी जितका पैसा व्यापार उद्योग धंद्यातून कमावला त्याच्या कितीतरी पट पैसा शास्त्रींनी मनात आणले असते तर कमावले असते.
परंतु देशप्रेमाने ज्याचे अंतःकरण पुरेपूर भरले आहे त्या अंतःकरणाला या मायेची मोहिनी कशी पडणार ? शास्त्रींनी एक मोटर विकत घ्यायची होती. पण मोटरीची किंमत एकदम द्यायला त्यांच्याजवळ पैसे नव्हते, शेवटी त्यांनी ती मोटर हप्त्यानें ध्यायची ठरविले. शेवट पर्यंत ते मोटारीचे हप्ते भरत होते .आणखी एक असाच प्रसंग.. अलाहाबादला त्यांना आपले घर असावे वाटे. त्यांना तसे एक विकाऊ घर सापडलेही ,पण मालकाने किमत सांगताना त्यांनी ओळखले की ही किमत आपल्याला परवडणार नाही ! त्यांनी घर घेण्याचे रहित केले. शास्त्रींचे बॅन्केत नावापुरतेच खाते होते. एका महान देशाची एक अपूर्व गाथा शास्त्रींनी आपल्या कर्तृत्वाने विणली होती.
सतत कार्यरत होणे हा शास्त्रींचा स्वभाव. दररोज सकाळी कितीतरी माणसे त्यांना भेटावयास येत. प्रत्येकाशी शास्त्रीजी बोलत. त्यांची सुख दुःखें विचारत. त्यांच्या अडीअडचणी समजून घेत आणि त्या दूर करण्याचा ते आटोकाट प्रयत्न करीत. बिहारचा एक सामान्य शेतकरी एकदा शास्त्रींकडे आला. आपल्या पद्धतीने जर त्या भागातील शेती केली तर उत्पन्न वाढेल, असे त्याचे म्हणणे होते. शास्त्रींनी ती संपूर्ण पद्धत नीट समजावून घेतली. त्यांना त्यात तथ्य वाटले. दुसऱ्याच दिवशी त्या प्रयोगाची योग्य ती दखल घेण्याचे फर्मान शास्त्रीनी त्या जिल्हयाधिकानर्यांच्या नावे काढले.
प्रयत्नांची पराकाष्ठा ही शास्त्रींची प्रार्थना होती ! ताश्कंद वाटाघाटी मध्ये तरी याशिवाय दुसरे आपणास काय दिसले ? स्वाभिमान आणि स्वदेश प्रीतिने ओतप्रोत भरलेला हा माणूस देशानी मान उन्नत ठेवण्याकरिता ताश्कंद येथे ज्या पद्धतिने वागले आणि यशश्री आपणाकडे खेचून आणली त्या पद्धतिला तोड नाही.! शास्त्रीजींच्या वैयक्तिक मुत्सद्देगिरीचाही तो महान विजय होता !
काही माणसांचे महत्व ते हयात असतांना आपणास वाटत असते t कळस चढवून दिला! म्हणून तर आपण पुन्हा पुन्हा म्हणत आहोत-शास्त्रीजी अमर आहेत ! शास्त्रीजी अमर आहेत !!
लेखक- जवाहर मुथा

Leave a Reply