महिला शक्ती प्रती कृतज्ञता

Uncategorized बातम्या

सहकारमहर्षी सुवालालजी गुंदेचा जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना मुदत ठेवीवर अधिक व्याज दर देणारी योजना जाहीर केली आहे. १०० दिवसांच्या ठेवीवर ६.५ टक्के तर २०० दिवसांच्या ठेवीवर ७ टक्के व्याज दर दिला जाणार आहे. १८ ते ३१ मार्च दरम्यान ठेवी ठेवल्यास हा लाभ मिळणार आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन किरण शिंगी व व्हाईस चेअरमन विनय भांड यांनी दिली.

संस्थेने ही योजना लागू करण्याचे ठरविले आहे. संस्थेने नुकतेच स्वमालकीच्या नूतन प्रशस्त व दिमाखदार वास्तूत स्थलांतर केले आहे. सहकार महर्षी सुवालालजी गुंदेचा व सभासदांचे मोठे स्वप्न पूर्ण झाले आहे. नव्या वास्तूतून आणखी दर्जेदार आधुनिक बँकींग सेवा दिली जात आहे. व आदर व्यक्त करण्यासाठी संस्थेकडे आजमितीस ७४

कोटींच्या ठेवी असून ५७ कोटींचे कर्ज वितरण आहे. संस्थेने कायम सभासदांचा विश्वास वृध्दींगत करणारा कारभार केला आहे.

संस्थेच्या संचालक मंडळावर महिला सदस्य असून अनेक महिला सभासद आहेत. संस्थेच्या प्रगतीत महिलांनी नेहमीच सक्रीय योगदान दिले आहे. त्यामुळे महिला दिन साजरा करताना ठेवींवर अधिकचा दर देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. सर्वच महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी संस्थेत संपर्क साधावा, असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply