नव्या वर्षातला पहिला दिवस, पहिला सण म्हणजे युगादि म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी शालिवाहन शकाचे नवे वर्ष सुरू होते. यंदाच्या पाडव्याला शालिवाहन शक १९४५ सुरू होत असून, शोभन नावाच्या संवत्सराची सुरुवात होत आहे. साडेतीन मुहूर्तांतील एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. नव्या गोष्टींचा आरंभ म्हणजे पाडवा. पाडव्याच्या दिवशी नवीन कामांना पं. गौरव देशपांडे देवी नवरात्रास तसेच श्रीरामांचे नवरात्राला सुरुवात करणे आध्यात्मिकरीत्या शुभ मानले जाते. पाडव्याच्या दिवशी सुरू केलेली कामे यशस्वी होतात, असे मानले जाते.
ब्रह्मपुराणानुसार जेव्हा ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, तो दिवस गुढीपाडव्याचा होता आणि त्याच वेळी सत्ययुगाची सुरुवात झाली. त्यामुळे या पाडव्याला आध्यात्मिक महत्त्व देखील आहे. राम ज्या दिवशी आपला वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून
या दिवशी पहाटे लवकर उठून अभ्यंगस्नान करावे व कडुलिंबाची पाने, ओवा, जिरे, चिंच, गूळ, हिंग घालून हे अमृतप्राय मिश्रण भक्षण करावे. ज्यायोगे आरोग्यप्राप्ती होते, असे शास्त्र सांगते. या दिवशी गुढीबरोबरच पंचांगाचे पूजन करतात. याच दिवशी वासंतीय सुरुवात होते. नवरात्राची घटस्थापना प्रातःकाळी म्हणजे सूर्योदयापासून सकाळी ९:०० वाजेपर्यंत केव्हाही करता येईल. या दिवशी जशी मनस्थिती ठेवाल, तसे वर्ष जाते. त्यामुळे या दिवशी मन प्रसन्न व आनंदी ठेवावे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस असल्याने सुवर्ण खरेदी, यंत्र खरेदी, वाहन खरेदी व कोणतेही काम सुरू करण्यास हा उत्तम दिवस मानला जातो.
महाराष्ट्र ज्योतिष संशोधन केंद्र, अहमदनगर