पंतप्रधान मोदींनी हस्‍ते शिर्डीमध्ये नमो शेतकरी योजनेचे पहिला हफ्त्याचे  शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

बातम्या

महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्प 2023-24 मध्ये शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या योजनांची घोषणा केली होती. यामध्ये एक रुपयात पिक विमा योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन योजनेचा देखील समावेश आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या एका महत्त्वाच्या बैठकीत नमो किसान योजनेसाठी 1720 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. या योजनेच्या पहिल्या हप्त्याला शिंदे सरकारने मंजुरी दिली. यामुळे या योजनेचा पहिला हप्ता आज 26 ऑक्टोबर 2023 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील 86 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाला आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने सुरू करण्यात आली आहे आणि त्यांच्याच हस्ते या योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा केले आहेत. त्यामुळे दिवाळी सणाच्या पूर्वीच शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली असल्याचे चित्र तयार होत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

खरंतर नमो शेतकरी योजना ही केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. नमो किसान योजनेअंतर्गत पीएम किसान प्रमाणेच वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. दोन हजार रुपयाच्या वार्षिक तीन समान हप्त्यात या योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. म्हणजे पीएम किसान अंतर्गत 6000 आणि नमो शेतकरी अंतर्गत 6000 असे एकूण 12 हजार रुपये राज्यातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत.

या योजनेसाठी राज्यातील 95 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत. यापैकी 86 लाख 40 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान या योजनेसाठी आवश्यक असलेल्या अटींची पूर्तता न केल्याने काही शेतकऱ्यांना या योजनेचा पहिल्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाहीये. ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही अशा शेतकऱ्यांना या योजनेचा पहिला हप्ता मिळालेला नाहीये. यामुळे या योजनेचा पहिला हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी केली पाहिजे असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply