साप्ताहिक नगर संकेत
‘स्वप्नवासवदत्ता’ या प्राचीन कवी भास यांनी सुमारे 1800 वर्षापूर्वी लिहीलेल्या सहा अंकी उत्कृष्ट नाटकाचे हिंदी रूपांतर आहे.त्या नृत्य नाटकाची मेजवानी नगरकरांना काल मोने कलामंदिरात अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ.अभय फिरोदिया यांनी उपलब्ध करून दिली होती. प्रारंभी त्यांच्या व्यक्तिमत्वाची चित्रफीत उपस्थितीना दाखविण्यात आली . त्यानंतर ‘स्वप्नवासवदत्ता’चा प्रयोग सुरू करण्यात आला. समकालीन स्वरूपातील हे एक आकर्षक नाटक आहे . यात कथेचे विविध पैलू, सौंदर्य, कला, प्रेम, राजकारण आणि देशभक्ती नृत्यनाट्याच्या रूपात दाखविण्यात आली . कथा, दिवे, संगीत, वेशभूषा, दागिने, सेट ही प्रेक्षकांची कल्पनाशक्ती वाढविण्यासाठी काळजीपूर्वक डिझाईन केलेले होते..
कवी भासांवर जैन साहित्याचा प्रचंड प्रभाव होता. त्यांनी लिहिलेली तेरा नाटके त्यावेळच्या समाजावर असलेल्या जैन धर्माच्या प्रभावानुसार होती. त्यानुसार राजकुमारी वासवदत्ता ची आई ही जैन होती असा जैन प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आहे. कवी भासांनी लिहिलेल्या या नाटकांमध्ये भगवान महावीरांच्या समकालीन राजे, दरबारी आणि थोर व्यक्तींचा उल्लेख येतो. त्यामुळेच ‘स्वप्नवासवदत्ता’ मध्ये जैन आणि बौध्द धर्मातील लोककथांचे संदर्भ येतात.
जैन साहित्यातील ग्रंथ (आवश्यक चुर्णी, आवश्यक टीका, उत्तराध्ययन सुखबोध, आख्यानमाणी कोष) आणि कुमार पाल प्रतिबोध मध्ये राजकन्या वासवदत्ता आणि राजकुमार उदयन यांचा संदर्भ आढळतो.
या नृत्यनाटकाची संकल्पना, निर्मिती आणि दिग्दर्शन कथ्थक नृत्यांगना मुग्धा पोतदार – पाठक यांनी त्यांच्या मुग्धा डान्स अकादमी प्रॉडक्शन हाऊस अंतर्गत केले . प्रख्यात अभ्यासक डॉ. सुनिल देवधर यांनी हिंदीत गीत काव्य नाट्य रचना केली . राष्ट्रीय पुरस्कार विजेले कलाकार श्री. श्याम भूतकर यांनी या सेटची रचना केली . निखिल महामुनी आणि आमोद कुलकर्णी यांनी संगीत दिले . योगिता गोडबोले, निखिल | महामुनी, नागेश आडगांवकर आणि प्रसिध्द बॉलिवूड गायिका महालक्ष्मी अय्यर यांनी ही गाणी गायली आहेत. | प्रभावी लाईट इफेक्ट्स हर्षवर्धन पाठक यांचे होते. अत्यंत आकर्षक स्वरूपात या नृत्य नाटकाचे सादरीकरण करण्यात आले होते. डॉ. अभय फिरोदिया यांच्या सहकार्याने अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छाया फिरोदिया यांनी ने हा प्रयोग सादर करून नगर करांना उत्कृष्ट संगीत नृत्य नाटकाची मेजवानी काल दिली.