विकृतीविरूध्द लढाई जिंकण्यासाठी संस्कृतीच्या एका छताखाली एकत्र या : डॉ. कांकरिया

बातम्या

अहिल्यानगर : सध्या समाजामध्ये स्त्री ही गर्भात किंवा बाहेरही सुरक्षित नाही. तिला माणुस न समजता एक भोगवस्तु म्हणून तिच्या विरूध्द अनेक विकृत बाबी होतांना दिसतात हे ताबडतोब थांबले पाहिजे. ही लढाई पुरूषाविरूध्द स्त्रीची लढाई नाही तर ही लढाई विकृती विरूध्द संस्कृतीची लढाई आहे. भारतीय संस्कृतीच्या छताखाली सर्वच स्त्री पुरूषांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करण्याची आवश्यकता आहे. स्त्री ची सुरक्षा-सन्मान व अधिकार तिला परत मिळवून दिला पाहिजे, असे मत डॉ. सुधा कांकरिया यांनी व्यक्त केले.

महर्षी ग.ज. चितांबर विद्यालयात रोटरी क्लब आणि इनरव्हिल क्लब (व्हिनस) ऑफ अहिल्यानगरच्यावतीने आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी विभावरी रोकडे यांनी तर रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगरद्वारे अध्यक्ष नितिन थाडे यांनी स्वागत केले. सदर प्रसंगी इनरव्हिल क्लब ऑफ अहिल्यानगर व्हिनस अध्यक्ष स्नेहलता आडेप, रोटरी क्लबचे सचिव सुभाष गर्जे, माजी अध्यक्ष माधवराव देशमुख, आदिनाथ ठोंबे, शाळेतील शिक्षकवृंद, विद्यार्थीनी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमात सखी सावित्री

समिती सदस्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. डॉ. सुधा कांकरिया यांनी स्लाईड शो व व्हिडीओ द्वारे गुड टच बॅड टच तसेच वयात येतांना या बाबी स्पष्ट केल्या. मुलींना स्व संरक्षणाचे धडे देण्यात आले. मनातील शंकाचे समाधान करून घेतले. सदर प्रसंगी नवरात्री निमित्त बालिका पुजन हा ही कार्यक्रम झाला. इनरव्हिल तर्फे मुलांना शैक्षणिक वस्तु भेट देण्यात आल्या. स्नेहलता आडेप यांनी आभार मानले.

Leave a Reply