राजीव तांबेंच्या कथासंग्रहाचे प्रकाशन
अभिनव कथा : प्रा. मिलिंद जोशी

बातम्या

सुदर्शन रंगमंच, पुणे : प्रत्येक माणसाच्या मनात भीतीचा डोह असतोच.लहानपणापासून थेंबा थेंबाने ही भीती मनात साठलेली असते. काम, क्रोध, मद, लोभ, मोह, मत्सर या षडरिपु प्रमाणे भीती हा काही माणसाचा शत्रु नाही. मृत्यू परवडला पण भीती नको असे म्हटले जाते कारण मृत्यू एकदाच येतो पण भीती पदोपदी मृत्युचा अनुभव देत असते. भीतीने मरतील मानवकुले प्रीती निमाली तरl असे कवीने म्हटले आहे त्यात बदल करुन उन्मादाने मरतील मानवकुले भीती निमाली तरl असे म्हणावे लागेल अशी ही भीती माणसाच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाला वेढून राहिलेली. या शुद्ध भीतीचा प्रत्यय देणाऱ्या कथा साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित लेखक राजीव तांबे यांच्या प्राण पिशाच्च या कथा संग्रहात आहेत. हा कथा संग्रह दिलीपराज प्रकाशनाने देखण्या रूपात काढला आहे प्रकाशक मधुर बर्वे याचे मन: पूर्वक अभिनंदन. या संग्रहाचे प्रकाशन प्रा. मिलिंद जोशी, साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे आणि गझलकार प्रदीप निफाडकर यांच्या हस्ते झाले. कथांचे प्रभावी अभिवाचन हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य. बाल कुमारांसाठी लिहिणारे लेखक या प्रतिमेतून बाहेर पडून राजीव तांबे यांनी या उत्तम कथा लिहिल्या त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

Leave a Reply