
अहील्यानगर येथील मा. जिल्हा न्यायधीश चंद्रचूड द. गोंगले यांची मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे, यांनी बहुराज्यीय सहकारी संस्थांसाठी संघटनात्मक व कायदेशीर बाबी विषयी, आर्थिक व लेखाविषय इत्यादी बाबींसाठी लवाद (Arbitrator) म्हणून २०२५ ते २०२८, ३ वर्षासाठी निवड केलेली आहे. त्यांचे निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. श्री. चंद्रचूड द. गोंगले यांनी यापूर्वी मा. मुंबई उच्च न्यायालयातही प्रशासक म्हणून चांगले काम पाहिलेले आहे. तसेच महाराष्ट्र सेल टॅक्स ट्रिब्यूनल, मुंबई यावर न्यायिक सदस्य (Judicial Member), तसेच Maharashtra Real Estate Appellate Tribunal वर रजिस्ट्रार (प्रबंधक) म्हणून काम पाहिलेले आहे. तसेच त्यांचे शालेय शिक्षण अहिल्यानगर येथील दादा चौढरी विद्यालय येथे, महाविद्यालयीन शिक्षण प्रेमराज सारडा कॉलेज येथे व कायद्याचे शिक्षण न्यू लॉ कॉलेज अहिल्यानगर येथे झाले. त्यांनी नगर जिल्हा न्यायालयात वकीली व्यवसाय केला व अहिल्यानगर जिल्हा वकील संघटनेचे सचिव म्हणून ही काम पाहिलेले आहे. तसेच ते मा. मुंबई उच्च न्यायलयाच्या लवाद समितीवरही कार्यरत आहेत