राजकीय इच्छाशक्ति व भाषा

अग्रलेख

मराठी भाषेच्या संदर्भात पुढील २५ वर्षांचे धोरण आखण्यासाठी नेमण्यात आलेल्या भाषा सल्लागार समितीने वैद्यकीय, विज्ञान-तंत्रशिक्षणाची भाषाही मराठीच व्हावी अशी शिफारस केली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्येही उच्च शिक्षण मातृभाषेतून देण्यावर भर देण्यात आला आहे. परंतु ही शिफारस स्वागतार्ह असली तरी ती प्रत्यक्षात उतरेल का खरा प्रश्न आहे. कारण गेली अनेक वर्षे हा विषय फक्त चर्चिला जात आहे. त्या अनुषंगाने कोणतीही सकारात्मक पावले पडलेली नाहीत. उलट प्राथमिक शालेय स्तरावरही मराठी ऐवजी इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याचे प्रमाण वाढत आहे. दुसरे म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर इंग्रजी भाषा असल्याने अशा वैद्यक, तंत्रज्ञान विषयांचे उच्च शिक्षण मराठीतून देण्याचा मुद्दा मागे पडत असल्याचे सांगण्यात येते. पण तेही अर्धसत्य आहे. कारण जगभर इंग्रजीचा प्रभाव असूनही जर्मन, जपानी, फ्रेंच, चिनी इत्यादी भाषांमधून ज्ञानशाखांची पुस्तके आणि अन्य संदर्भ साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. एकूणच काय तर मराठी ही ज्ञानभाषा होण्यासाठी व ती अंमलात आणण्यासाठी सर्वप्रथम प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे.

Leave a Reply