प्रा. जवाहर मुथा यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार प्रदान

बातम्या

पुणे : ‘देशात जेव्हा सामान्य व्यक्तींवर अन्याय होतो, तेव्हा लेखणीद्वारे साहित्यिकांना त्याविरोधात आवाज उठवायचा असतो. कारण ईश्वराने तुम्हाला सर्जनशीलतेची देणगी, एक शक्ती दिलेली आहे. ती तुम्ही प्रामाणिकपणे वापरून लिहिले पाहिजे. साहित्यिकांनी ‘मन की बात’ केली पाहिजे, असे आवाहन नवी दिल्लीच्या साहित्य अकादमीचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक माधव कौशिक यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेच्या विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे होते. , मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी,विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्यवाह अंजली कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे च्या वतीने ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार प्रा. जवाहर मुथा यांना त्यांच्या मराठी लेखन योगदानाबद्दल 2023चा मालिनी शिरोळे स्मृती पुरस्कार काल रविवारी पुण्यात नवी दिल्ली च्या साहित्य अकादमी चे अध्यक्ष डॉ. माधव कौशिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.हा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे च्या वर्धापनदिन निमित्ताने संपन्न झाला. सदर कार्यक्रम एस्. एम्. जोशी सभागृहात झाला. प्रा. जवाहर मुथा यांच्या समग्र साहित्यावर, त्यांच्या चाळीसेक पुस्तकांवर,पुणे विद्यापीठात पीएच डी झाली असून आजही ८४व्या वर्षी ते सातत्याने लेखन -संशोधन करीत असतात.ज्योतिष शास्त्राचाही त्यांचा व्यासंग गाढा आहे. भविष्यवेध या त्यांच्या राज्य पुरस्कार प्राप्त ग्रंथाच्या तीन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.प्रा.मुथा महाराष्ट्र साहित्य परिषद, अहमदनगर शाखेचे सन 1990/95 मध्ये अध्यक्ष म्हणून लक्षणीय कार्य केले आहे, हेही महत्त्वाचे.

उपस्थितांचे स्वागत कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी आपल्या ओघवत्या भाषेत केले.आभार कोषाध्यक्ष सुनिता राजे पवार यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह अंजली कुलकर्णी यांनी केले

1 thought on “प्रा. जवाहर मुथा यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार प्रदान

  1. साहित्य पुरस्कार सोहळा उत्तमच संपन्न झाला. संयोजकांचे व कार्याध्यक्ष प्रा मिलींद जोशी यांचे मनःपूर्वक अभिनंदन त्यांच्या प्रास्ताविकासाठी.. डॉ महादेव सगरे, सहकार्यवाह, भारती विद्यापीठ

Leave a Reply