डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे अमृत महोत्सव संपन्न

बातम्या

आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष, साप्ताहिक नगर संकेत चे हितचिंतक,व माजी प्राचार्य डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांच्या अमृतमहोत्सवी वर्ष परिपूर्ती निमित्त साहित्य क्षेत्रातिल व्यक्तींच्या व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांचा नुकताच सन्मान करण्यात आला. छोट्याखानी झालेल्या या कार्यक्रमात अखिल भारतीय | मराठी साहित्य परिषदेच्या नगर शाखेचे अध्यक्ष विनायक पवळे यांनी रेखाटलेले पेन्सिल स्केच प्रा.सहस्रबुद्धे देवून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाईसथ्था नाईट स्कूलचे प्राचार्य सुनील सुसरे, प्रा.डॉ.मुसा बागवान,विश्वस्त उषा सहस्रबुद्धे, प्रा.डॉ. मछिंद्र मालुंजकर, प्रा.डॉ.राजू रीक्कल, प्रा. स्फूर्ती देशपांडे, गजेंद्र गाडगीळ, प्रा.क्रता ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी विनायक पवळे, प्राचार्य सुनील सुसरे यांची भाषणे झाली. डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, वयाच्या पंचाहत्तारी गाठतांना अर्धांगिनीसह माझे विद्यार्थी व अनेकांनी मोलाची साथ दिली. महर्षी अगस्ती ऋषींचे व अनेक संत मंडळींच्या आशीर्वादाने अनेक क्षेत्रात काम करत आहे. स्नेही ‘विनायक पवळे यांनी माझे पेन्सिल चित्र रेखाटून आश्चर्यचकित केले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. मछिंद्र मालुंजकर यांनी केले डॉ.राजू रीकल यांनी शेवटी आभार मानले.

Leave a Reply