जैन साहित्य आणि दीपावली…

लेख

लेखक : प्रा जवाहर मुथा

दिपावली चा दिवस म्हणजे भ. महावीरांचा स्मृती दिन.. या दिवशी भ. महावीर इंद्रलोकात गेले. तो दिवस जैन धर्मातील पवित्र दिवस. त्यानिमित्ताने जैन धर्मातील साहित्याचा परिचय करून घेऊ या..
जैन साहित्य व त्याची ग्रंथसंपदा अत्यंत विशाल व व्यापक आहे. धार्मिक साहित्य म्हणून त्यांची गणना तर आहेच, परंतु त्याशिवाय अनेक कथा, कविता , महाकाव्य यांची निर्मिती ही त्यामधे झालेली आहे . प्राकृत ,अपभ्रंश ,शौरसेनी व नंतरच्या काळात संस्कृत भाषेत , हे विपुल ग्रंथ , आपल्या दृष्टिपथात येतात. जैन धर्मात , जितकी साहित्य विषयक ग्रंथसंपदा आहे , तितकी अन्य कोणत्याही धर्मात नाही. महावीरांच्या कार्यकर्तृत्वाचे केंद्र मगध मध्ये होते . त्यांनी लोकभाषेत,म्हणजेच अर्धमागधीत, आपला उपदेश दिला . तो सर्व जैन आगमात सुरक्षित आहे. आगम 45 आहेत . त्यांना श्वेतांबर जैन प्रमाण मानतात .. दिगंबर जैन षट्खंडागम या ग्रंथराजाचाही स्वीकार करतात .हा ग्रंथ बाराव्या अंगदृष्टीवादाचा अंश मानला गेला आहे. या ग्रंथाची भाषा शौरसेनी आहे .त्यानंतर अपभ्रंश तथा अपभ्रंशाच्या उत्तरकालीन असलेल्या लोकभाषेतही अनेक जैन पंडितांनी ग्रंथ व भाषा साहित्य समृद्ध केले .आदिकालीन साहित्यातील ग्रंथ सर्वाधिक संख्येत प्राप्त होतात. जैन ग्रंथकारांनी पुराण ,चरित्र ,कथा काव्य , रास इ. विविध प्रकारचे ग्रंथ रचले . स्वयंभू, पुष्पदंत, आचार्य हेमचंद्र , सोमप्रभसूरिजी इ.मुख्य ग्रंथकर्ते व कवी आहेत. त्यांनी लिहिलेल्या प्रचलित लोककथांवर, नंतरच्या काळात इतर धर्मीयांनीही त्या वाड़मयाचा उपयोग करून घेतला. जैन साहित्यातील प्राचीन वाड़मय ‘ आगम ‘ या नामाभिमानाने ओळखले जाते . ते 46 आहेत. 12 अंग,12 उपांग , 10 पइन्ना , 6 छेदसूत्र, व 4 मूळसूत्रं ; अशी त्यांची विभागणी होते , हे आगम ग्रंथ अत्यंत प्राचीन , म्हणजे इसवी सनापूर्वीचे आहेत. जीवनोपयोगी सूत्र व महावीरांचा सर्व उपदेश यामध्ये संग्रहित आहे .जैन धर्म हा जगातील एकमेव पहिला व प्रमुख धर्म आहे. हा अत्यंत प्राचीन भारतीय धर्म असून तो निर्ग्रंथ म्हणून होता. प्रथम तीर्थंकर श्री रिषभदेवांनी त्याची स्थापना केली.व तो एक स्वतंत्र धर्म मानला जातो. अतिप्राचीन धर्म असलेला जैन धर्म हा लोकशाही विचार मूल्य असलेला भारतातील महत्त्वाचा धर्म आहे. या धर्माने समता, स्वातंत्र्य आणि न्याय या विचारांचा पुरस्कार केलेला आहे. ‘जगा आणि जगू द्या’ या विचारांवर जैन धर्माचे तत्त्वज्ञान आधारलेले आहे. अनेकांतवाद हा जैन धर्मातील महत्त्वाचा विचार आहे, की जो मानवी कल्याणाचा पुरस्कार करतो. मानवतेच्या कल्याणासाठी सतत जागृत राहून कार्य करण्याचे अभिवचन अनेकांतवादामधून दिले गेलेले आहे. जैन धर्माचे अधिक सोप्या भाषेमध्ये विश्लेषण करण्याचे काम महावीरांनी केले. ते चोविसावे तीर्थंकर होते. सम्यक दृष्टी असलेला अनेकांतवाद अधिक स्पष्टपणे मांडण्याचे काम त्यांच्या काळामध्ये झाले. या धर्माला फार मोठ्या प्रमाणात राजाश्रय देखील मिळाला .मौर्य सम्राट चंद्रगुप्ताने आपल्या शेवटच्या काळामध्ये याचा स्वीकार केलेला होता. सम्राट अशोकाने तीर्थंकर महावीरांच्या सिंहाचे चिन्हाचा स्वीकार केला होता . आज आपल्या भारताच्या ध्वजावर जे धर्मचिन्ह – चक्र आहे , त्यात 24 आरे आहेत. हे 24 आरे इतर कोणत्याही धर्म क्षेत्रात नाही,केवळ जे 24 तीर्थंकर झाले , त्यांची स्मृती या चोवीस आर्यामधे अप्रत्यक्ष गोवली गेली आहे.. सारनाथ येथे जो सिंहाचा स्तंभ आहे त्याच्या चारही दिशांना चार सिंह आहेत. त्याशिवाय सिंह,बैल. हत्ती , व अश्व यांचे शिल्प आहे. हे चारही अनुक्रमे ऋषभदेव, अजितनाथ , संभवनाथ व महावीर या तीर्थंकरांची चिन्हें आहेत. जैन धर्म हा अतिप्राचीन धर्म मानला जातो. इसवी सन पूर्व सहाव्या शतकामध्ये संपूर्ण जगामध्ये अनेक धर्म संप्रदाय त्या नंतर उदयाला आले.. या काळात जगामध्ये ६२ धर्म संप्रदाय उदयाला आले. चीनमध्ये कन्फ्यूशियस तर इराणमध्ये पारशी हे धर्म संप्रदाय उदयाला आले. जैन धर्मामध्ये एकूण चोवीस तीर्थंकरांची परंपरा सांगितली जाते . जैन कथेनुसार वृषभ हा पहिला तीर्थंकर होता तर तेविसावे तीर्थंकर म्हणजे पार्श्वनाथ. याचे आरंभीचे जीवन हे सुखकारक होते. मात्र पुढे वयाच्या तिसाव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला . त्यानंतर त्याना ज्ञानप्राप्ती झाली. पार्श्वनाथांचा हा काळ इसवीसनपूर्व 8 वे शतक मानला जातो महावीरांचा जन्म इ.स.पुर्व सहाव्या शतकात झाला होता.सोबतचे छायाचित्र महावीरांचे जन्मस्थान कुंडलपुर, बिहार येथील स्मृतिमंदिरातील दर्शनासाठी गेलो असतानाचे आहे.
– प्रा. जवाहर मुथा जैन अहमदनगर

Leave a Reply