गिते व नगरकर यांना राज्य हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

Uncategorized बातम्या

राजभाषा हिंदी चे साहित्यिक विलास गिते व बीएसएनएलचे सेवानिवृत्त विजय नगरकर यांना पुरस्कार जाहिर झाले आहेत. या पुरस्कारांचे वितरण मुंबईतील रविंद्र नाट्य मंदिर सभागृहात होणार आहे.

मोलाचे कार्य व भरीव योगदान देणाऱ्या साहित्यिकांना तसेच प्रतिवर्षी उत्कृष्ट वाड्मय हिंदी साहित्य अकादमीचा निर्मितीसाठी लेखकांना उत्तेजन देण्यासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. त्यानुसार राज्य हिंदी साहित्य अकादमीद्वारे सन २०२०- २१, २०२१-२२ व २०२२-२३ या तीन अधिकारी वर्षासाठी पुरस्कारांची घोषणा राज्य शासनाचे उपसचिव विलास थोरात यांनी केली. त्यात नगरचे विलास गिते यांना गजानन माधव मुक्तीबोध मराठी भाषी हिंदी लेखक हा लवकरच पुरस्कार, तर विजय नगरकर यांना डॉ. होमी भाभा जहांगीर हा पुरस्कार त्यांच्या ‘ डिजीटल की हिंदी यात्रा’ या पुस्तकासाठी जाहीर झाला. या पुरस्कारांचे लवकरच मुंबई येथील रविंद्र नाट्य मंदिर सभागृहात होणार आहे. राज्य हिंदी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल या दोघांचे त्यांच्या मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे

Leave a Reply