शेतकर्‍यांच्या सर्व समस्या दूर करण्यासाठी ग्रामस्वराज निर्मितीसाठी राष्ट्रीय किसान समन्वय समिती कार्य करणार
-अशोक सब्बन

बातम्या

राष्ट्रीय किसान समन्वय समितीची दक्षिण भारतातील शेतकऱ्यांच्या संघटनाच्या प्रतिनिधी ची तीन दिवसाची कार्यशाळा नुकतीच कर्नाटक राज्याच्या राजधानी असलेल्या बंगलुरू येथिल म.गांधी भवन येथे संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी सत्ताविस संघटनांचे सुमारे एकशेविस प्रतिनिधीनी उपस्थिती दर्शवून परिसंवाद,चर्चा सत्र,प्रश्न उत्तरे,या मार्फत विचाराचे व भूमिकांचे आदान प्रदान केले. या परिषदेत समारोपात देशभरातील शेतकऱ्यांच्या सर्व समस्याची सोडवणूक करण्या साठी म.गांधीनी दाखवलेल्या मार्गचा अवलंब करून “ग्रम स्वराज” या कल्पना स्विकारून विकासात्मक व शासनाकडे प्रलंबित असलेल्या काही विषयावर संघर्षात्मक भूमिका घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. प्रचार प्रसार व संघटनात्मक बाबीची पूर्तता करून देशपातळीवर एकाच वेळी सर्व जिल्ह्यात जनआंदोलन उभारण्याचा प्रयत्न करण्याची तयारी सुरू करावे असे हि ठराव करण्यात आले.

सदर कार्यक्रमचे संयोजन दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील नव कर्नाटक रयत संघाने पार पाडली
या परिषदेमध्ये किसान समन्वय समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी दशरथ कुमार,यांची पुढील वर्षासाठी फेर निवड करण्यात आली.

या कार्यशाळेत राष्ट्रीय लोक आंदोलनाचे सरचिटणीस अशोक सब्बन यांनी पंचायतराज या विषयावर तीन ही दिवस सविस्तर मार्गदर्शन करू विविध ठराव मांडण्यात पुढाकार घेतला व लवकरच कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे असे सांगितले.
तीन दिवशीय कार्यायशाळेत वाराणसी येथिल जेष्ठ म.गांधी विचार प्रचारक अमरनाथ भाई,तामिळनाडूचे सुंदरम,जे चिन्नाप्पा,कर्नाटकचे दयानंद पाटील, आर.वाय. उमादेवी,सुरीथ्राआंमा, कलबुर्गी जिल्हा परिषदचेचे उपाध्यक्ष मंहता हिरेमठ,केरळचे प्रा.ई.पी.मेनन, आंध्रप्रदेशचे शिवाजीनागाप्पा, दलजीत कौर, यासह अनेक कार्यकत्यानी सहभाग नोंदवला.

Leave a Reply