इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्सचे नवीन जागी स्थलांतर

बातम्या

दि इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), अहमदनगर स्थानिक केंद्र दिनांक १५ सप्टेंबर रोजी अभियंता दिनाचे औचित्य साधून नगर-कल्याण रस्त्यावर स्वत:च्या जागेत स्थलांतरित झाले. गेल्या ३७ वर्षांपासून संस्थेचे कामकाज पाटबंधारे विभागातील इमारतीमधून चालत होते. कामकाजाच्या दृष्टीने स्वत:च्या इमारतीची आवश्यकता भासल्याने संस्थेने, संस्थेचे संस्थापक सदस्य कै. कृष्णकांत राजे यांनी नगर-कल्याण रस्त्यावर बक्षीसपत्र करून दिलेल्या ८०० चौ. मी. भूखंडावर, संस्थेचे सभासद व एम आय डी सी तील उद्योजक व इतर दानशूर व्यक्तींच्या देणगीमधून तीन मजली इमारतीचे बांधकाम सुरू करून पहिला मजला पूर्ण केला आहे.

भारत फोर्ज लिमिटेड च्या सहकार्याने संस्था कौशल्य विकास केंद्राची स्थापना करत असून, संस्थेला राज्य शासनातर्फे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र म्हणून मान्यता मिळाली आहे. नुकतीच भारत फोर्ज लिमिटेडच्या मानव संसाधन उपाध्यक्षा डॉ. लीना देशपांडे यांनी भेट देऊन संस्थेच्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. अभियंत्यांसाठी लवकरच आधुनिक तंत्रज्ञानावर तसेच आर्टिफिशियल इंटेलिजियन्स वर आधारित कौशल्य विकास कोर्सेस सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.

या प्रसंगी आयोजित केलेल्या समारंभाला संस्थेचे सभासद व देणगीदार, उद्योजक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या, ज्यात श्नायडर इलेक्ट्रिक इंडिया चे उपाध्यक्ष श्री. अरविंद पारगावकर, पाटबंधारे विभागाचे माजी अधीक्षक अभियंता श्री. शिवाजी बोलभट, ए. बी. चौधरी, डॉ. सुनील गोरंटीवार, आदिनाथ लवांडे, संदीप डेरे, सुभाष गांधी, दिलीप आढाव, प्रदीपकुमार ब्रम्हा, रविंद्र कवडे, पी. एस. पांडे, प्रमोद पारिख यांचा समावेश आहे. खासदार श्री. नीलेश लंके यांनीही सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या कार्याची माहिती घेतली व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. संस्थेचे अध्यक्ष श्री. मनोहर अणेकर, मानद सचिव श्री. अभय राजे, माजी अध्यक्ष श्री. प्रकाश गांधी व अविनाश कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य सर्वश्री मधुकर बालटे, भारतभूषण भागवत, राजकुमार मुनोत, हरिश्चंद्र ठिगळे, रामनाथ वायकर, किशोर डोंगरे, दीपक विधाते, डॉ. दादासाहेब करंजुले अंसार शेख, यांनी सर्वांचे स्वागत केले.

Leave a Reply