महासती मधुर भाषिणी ज्ञान प्रभाजी सरल म.सा. ६३व्या वर्षात पदार्पण

बातम्या

आज कार्तिक शुक्ल पंचमीचा दिवस हा महासती मधुर भाषिणी ज्ञान प्रभाजी सरल’ यांचा जन्म दिवस.. जैन धर्मामध्ये या तिथीला अनन्यसाधारण महत्व आहे. कारण या दिवशी जैन आचार्य धरसेन यांचे शिष्य आचार्य पुष्पदंत आणि आचार्य भूतबली यांनी ‘षटखंडागम शास्त्र’ रचले. तेव्हापासून ही पंचमी ज्ञान पंचमी म्हणून हा सण भारतात साजरा केला जाऊ लागला..अशा या तिथीला कर्मधर्म संयोगाने इ. स. १९६१ मध्ये महासती मधुर भाषिणी ज्ञान प्रभाजी सरल’ यांचा जन्म झाला. आज त्या ६३व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. नवीपेठ जैन स्थानकात त्यांचा चातुर्मास चालू आहे… कालौघात ज्ञानपंचमीच्या या पवित्र दिवशी मंदिरात व घरात ठेवलेले जुने धर्मग्रंथ स्वच्छ करून धर्मग्रंथांचे जीर्णोद्धार केले जाऊ लागले. शास्त्र आणि ग्रंथांचे भांडार स्वच्छ करून वाचन व पारायणे होऊ लागली.. ज्ञानाचा प्रकाश पसरविणाऱ्या या ज्ञान पंचमी लाच पुढे श्रुतपंचमी,लाभपंचमी म्हणू लागले. या दिवशी मोठ्या संख्येने जैन अनुयायी चांदीच्या पालखीवर जैन धर्मातील प्राचीन धर्मग्रंथ ठेवतात आणि जैनवाणीची व धार्मिक शास्त्रांची मिरवणूक काढतात. त्यांना जैन धर्मावर श्रद्धा असलेले लोक या यात्रेत सहभागी होतात.आचार्य सम्राट आनंदॠषि यांच्या मते भक्ती ही शक्तीसोबत असली पाहिजे आणि भक्तीसोबत शक्तीही असली पाहिजे. तसेच प्रेमाला भक्तीची साथ हवी. नुसती सत्ता असेल तर विनाश घडवते. शक्तीशिवाय भक्ती आणि श्रद्धेशिवाय भक्ती व्यर्थ आहे.

अनेक जैन मंदिरांमध्ये ज्ञानाच्या विकासासाठी ब्राह्मींनी आगमानुसार जप केला.. श्रुत पंचमीला ज्ञानामृत उत्सव असेही म्हणतात. या तिथीला जन्मलेले जातक सामाजिक वर्तनात कुशल असतात. ते ज्ञानी असतात आणि त्यांच्या गुणांची प्रशंसा सर्वत्र केली जाते. ते त्यांच्या कर्तव्यावर प्रेम करतात. ते धर्मादाय कार्यात सहभागी होतात. ते नेहमी न्यायाचा मार्ग अवलंबतात. या तिथीला जन्मलेले लोक भावनिक आणि बौद्धिकदृष्ट्या मजबूत असतात. ते चांगले जीवन जगतात. त्यांना प्रसिद्धिही मिळते. हे सर्व गुण या चातुर्मासात आपण मधुर भाषिणी ज्ञान प्रभाजी सरल’ महासती यांच्या द्वारे अनुभवत आहोत. आज त्यांच्या वाढदिवशी आपण सर्व जण त्यांना अभिवादन व अभिनंदन करू या. त्यांच्या जिवनात कधीच दुःखाची सर नसावी, प्रत्येक क्षणी सुखानेच भरलेली आपली ओंजळ असावी, देवाने त्यांना इतकी खुशी द्यावी की, त्यांचा हा धार्मिक आनंद गगनचुंबी ह्वावा. वाढदिवसाच्या खूप खूप अनंत शुभेच्छा!

– प्रा. जवाहर मुथा, अहमदनगर

Leave a Reply