नगर शहरातील विविध परिसर, चौक, गल्यांची नावे आता बदलणार

बातम्या

नगर : नगर शहरात पूर्वापार चालत आलेली विविध परिसर, चौक, गल्ल्यांची नावे आता बदलण्यात येणार आहे. राज्य शासनाने डिसेंबर 2020 मध्ये घेतलेल्या एका निर्णयाची अंमलबजावणी महानगरपालिकेने सुरु केली आहे. शासन निर्णयानुसार सामाजिक सलोखा, सौहार्द तसेच एकात्मतेसाठी रस्त्यांची, गावांची, चौकांची जातीवाचक नावे बदलण्यात येणार आहेत. अशा नावांऐवजी महापुरुषांची, लोकशाही मूल्यांशी निगडीत नावे देण्याचे आदेश आहेत. त्यानुसार नगर मनपाने शहरातील गल्ली, परिसर, रस्त्यांना असलेली जातीवाचक नावे बदलण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. 19 ऑक्टोबर रोजी याबाबतचे आवाहन जारी करण्यात आले आहे. संबंधित ठिकाणांना पर्यायी नावे सुचविण्यासाठी नागरिकांना 15 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

कोणत्या रस्त्यांची, गल्लीची, परिसराची नावे बदलणार त्याची यादी पुढीलप्रमाणे, – ब्राह्मण कारंजा, ईदगाह मैदानाजवळ, ब्राह्मण गल्ली, माळीवाडा, भिल्ल वस्ती, सावेडी नाका, वैदूवाडी, मोचीगल्ली, कुंभार गल्ली, खाटिक गल्ली, सिध्दार्थनगर हरिजन वस्ती, बौध्दवस्ती, भवानीनगर ढोरवस्ती, गवळीवाडा, कसाई गल्ली, केडगाव वडारवस्ती, बागवान गल्ली, ख्रिश्चन कॉलनी, तेलीखुंट, सिंधी कॉलनी, पाईपलाईन रोड वाणीनगर, वंजार गल्ली, पिंजार गल्ली, परदेशी गल्ली, ख्रिस्तगल्ली, मिसगर चाळ, बुरुडगल्ली, केडगाव मराठा नगर, गुजर गल्ली.

शहरात पूर्वीपासून विविध गल्ल्या, परिसरांना ही नावे प्रचलित आहेत. आता शासनाच्या निर्णयानुसार यात बदल होणार असून नगरकर या नवीन नावांना कसा प्रतिसाद देतात हे पहावे लागेल.

Leave a Reply