This is starting
दिल्लीहून प्रकाशित होणाऱ्या 'ऑर्गनायझर' या इंग्रजी साप्ताहिकाचे माजी संपादक व नंतर मुंबईहून प्रकाशित होणाऱ्या 'हिंदू व्हिजन' या इंग्रजी मासिकाचे संस्थापक-संपादक,अनेक इंग्रजी आणि मराठी ग्रंथांचे लेखक,भाषांतरकार
श्री सुधाकर राजे यांचे काल वृद्धापकाळाने, वयाच्या ९८ व्या वर्षी मुंबईतील रहात्या घरी दु:खद निधन झाले..
श्री. राजे यांनी हिंदू संस्कृतीचा जागतिक इतिहास सांगणारा हजार पानांचा इंग्रजी ग्रंथ लिहिला होता. शिवाय मुस्लिम मध्यपूर्वेचा हिंदू इतिहास, बुद्धपूर्व तिबेटचा हिंदू इतिहास, अल् - कायदाचा इस्लामी दहशतवाद या विषयांवर त्यांची इंग्रजी पुस्तके प्रकाशित आहेत.
पाकिस्तानी दहशतवादावरील इंग्रजी पुस्तक आणि अल्-कायदा या पुस्तकांची मराठी आवृत्तीही प्रकाशित झाली होती.
त्यांनी प्राचीन युरोपचा हिंदु इतिहासही लिहिला होता. शिवाय त्यांनी संस्कृतोद्भव इंग्रजी शब्दांचा संक्षिप्त शब्दकोशही तयार केला होता.
श्री. सुधाकर राजे यांनी २०-२५ मराठी व हिंदी पुस्तकांचे इंग्रजीत भाषांतर केले होते, त्यात भूतपूर्व पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या संसदेत हिंदीत केलेल्या भाषणांच्या चार खंडांचा समावेश आहे. श्री.राजे यांनी डिप्लोमॅटिक पदावर कार्य केले आहे. कॅरिबियन प्रदेशातील गयाना देशात भारत सरकारतर्फे चालविण्यात येणाऱ्या इंडियन कल्चरल सेंटरचे ते संचालक होते..
'ख्रिस्ती धर्माचा काळा इतिहास' हा सुधाकर राजे यांचा ग्रंथ मोरया प्रकाशनाने २०२० साली प्रकाशित केला होता..
व्यासंगी पत्रकार,लेखक कै.सुधाकर राजे यांना मोरया प्रकाशन परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली...