फादर फ्रान्सिस दिब्रिटो

बातम्या

साहित्यिक व पर्यावरणवादी चळवळीतील लढवय्ये कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. मागील काही वर्षांपासून ते आजारी होते. वसईत त्यांनी आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. फादर फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे धाराशीव (उस्मानाबाद) येथे पार पडलेल्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वासोबत पर्यावरण चळवळीवर शोककळा पसरली आहे.” फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले तरी त्यांची खरी ओळख ही पर्यावरणप्रेमी, पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरोधात आवाज उठवणारे कार्यकर्ते अशीच राहिली आहे”., असे उद्गार ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जवाहर मुथा यानी त्याना श्रद्धांजली अर्पण करताना साप्ताहिक नगरसंंकेतच्या कार्यालयात काढले. पालघर जिल्ह्यातील वसई तालुका आणि जवळपासच्या परिसरात त्यांनी सातत्याने पर्यावरणाच्या बाजूने भूमिका घेतली होती. ‘सुवार्ता’ या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि काही उपक्रमही राबवले होते, असेही मुथा म्हणाले. त्यांनी आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा
ओअ‍ॅसिसच्या शोधात (प्रवासानुभव, मूळ – दैनिकातील सदर). इंग्रजी रूपांतर ‘इन सर्च ऑफ दि ओॲसिस’; अनुवादक – फ्रान्सिस दिब्रिटो+रेमंड मच्याडो), ख्रिस्ताची गोष्ट (चरित्र),
ख्रिस्ती सण आणि उत्सवतेजाची पाऊले (ललित)नाही मी एकला (आत्मकथन).संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास अशी महत्त्वाचे साहित्य निर्माण केले होते, असेही प्रा. मुथा म्हणाले.

Leave a Reply