gXao

हिंदी हायकूंचा सुगंध

स्वतंत्र झालो
काहीही करण्याचे
स्वातंत्र्य आले

तूच अक्षत
तुझ्या विना रे सारे
क्षत - विक्षत

नारी त सती
सतवतो तो नर
हेच अंतर

यंत्र युगात
यंत्र मानव आम्ही
अनियंत्रित

तिथे चला रे
जीवनाचे संगीत
जिथे वसते

पानगळीत
ऋतूने खरीदली
सगळी बाग

धकधकते ही
चारी बाजूंना पहा
भुकेची आग

निसर्गबाला
फुलांच्या प्याल्यांनी
पाजे मद्याला

तोच तो सूर्य
जीवनसुद्धा तेच
सकाळ नवी

मला दिसले
वितळत्या बर्फात
गिरीचे दु:ख

उगवता व
अस्त होता सूर्याचा
रंग एकच

कसे सांगू मी
मनातले गुपित
अनोळख्याला


मिर्झा गालिब

 

शोले से न होती, हवस-ए-शोला ने जो की,
जो किस क़दर अ़फ़्सुर्दगि-ए-दिल पे जला है.

          मी प्रेमाच्या आगीत जळून मेलो असतो, तर दु:ख तरी नसतं ! मी त्या आगीत जळून विझलो ! आता या विझलेल्या मनाला पाहून माझं हृदय जळतय्...

ऐ परतव-ए-़खुरशीद-ए-जहां ताब, इधर भी,
साए की तरह पे अजब वक्त पड़ा है.

          सर्व जगाला प्रकाश देणाऱ्या हे सूर्या ! माझ्याकडे एखादा कीरण तरी फेक ! सावली प्रमाणे, माझ्यावर सध्या खराब वेळ आहे रे....

नाकरदा गुनाहों की भी हसरत की मिले दाद,
यारद अगर इन कारदा की सज़ा है.

          मी न केलेल्या गुन्ह्यासाठी ही हे ईश्वरा, तू माझी दाद दे आणि मग केलेल्या गुन्ह्यांची मोजदाद करून शिक्षा दे !

बेगानगि-ए-़खल्क से बेदिल न हो ग़ालिब
कोई नहीं तेरा, तो मेरी जान ़खुदा है.

          या दुनियेच्या बेदिली ने तू त्रस्त होऊ नकोस ! ज्याचा कोणीच नसतो, त्याचा ईश्र्वर असतो !

- प्रीति घोष

 

सदाचार-               

।। सज्जन।।

सज्जनाकडे अवगुण असतो का ? तर तो मुळीच नसतो. तुम्ही म्हणाल, असे कसे ? मी म्हणेल, तुकाराम काय सांगतो आहे ते पहा-चंदनाचे हात, पाय ही चंदन
परिसा नाही हीन कोणी अंग।।दीपा नाहीं पोटीं पाठीं अंधकारसर्वांगे साकार अवघी गोड।।तुका म्हणे तैसा सज्जनापासूनपाहतां अवगुण मिळेचि ना।।चंदन हा अंतर्बाह्य चंदनच असतो, परिसाचे कोणते ही अंग हीन नसते, दिवा काही अंधाराला जवळ करीत नाही आणि साखर ही चार ही बाजूंनी गोडच असते ! "सज्जन' हा तितकाच "सज्जन'च असतो ! शोधून ही त्यात अवगुण मिळणार नाही ! तुम्ही म्हणाल- "असे कसे ? एखादा तरी अवगुण असेलच ना !' मी म्हणेन, "तसे असेल तर तो सज्जनच नाही !' सर्वांचे सदोदित जो हीतच पाहतो तोच खरा सज्जन ! त्याला ओळखणे हा एक दिव्य अनुभव आहे. तो दुर्मीळ आहे, हे खरे !

।। साहित्याची दलाली।।

साहित्यात ही "सदाचार' असावयास हवा असे जर आम्ही सांगितले तर अनेकांच्या भुवया उंचावतील. परंतु ते खरेच आहे. साहित्यातील सदाचार म्हणजे भावना, विचार, संवेदना आणि शब्द-सामर्थ्यातील प्रगल्भता ! त्या सर्वांशी एकनिष्ठता, घनिष्ठता आणि समरसता या गोष्टी ज्यांच्या जवळ नाहीत, त्यांनी खरे तर काही लिहिण्याला हातच घालू नये ! तुम्ही कविता करता, कवी म्हणून, म्हणवून घेता आणि लिहिता काय तर वात्रटिका ! हा साहित्यातील एक प्रकारचा दुराचारच आहे. एकनिष्ठ साहित्याला डावलणे आणि दुराचारी शब्दांना मांडीवर बसवणे, हे जेथे घडते, तेथे खरी सृजनता हमसून-उमसून अश्रू गाळत असते ! आज सर्वत्र तेच चालले आहे. सांगलीच्या साहित्य संमेलनातही तेच झाले ! याचा तळतळाट माजी अध्यक्ष व आजी अध्यक्ष यांना ही लागला ! अपशकुनाची नांदीच ती होती. सूत्रे प्रदान न करताच माजी अध्यक्ष निघून गेले. आता सूत्रेच नाहीत, तर अध्यक्षपद काय कामाचे ? साहित्याची एकनिष्ठता, एकताना व एकोपाच संपला तर सर्जनशीलता काय करेल ? शेतकऱ्यांच्या आत्महत्या इतकाच हा साहित्याचा आत्मघातीपणा आहे, हे आपल्याला कळले पाहिजे. "कपडे वीतभर, जाहिराती हातभर'च्या या जमान्यात वात्रटिकाकार वाल्मिकी बनून राहिले आहेत. सत्यवती साहित्यिकाला अंग झाकण्या इतके वस्त्र नाही आणि दुर्वृत्ती "साहित्यिक' वेश्येसारखा पेहराव करून मिरवून घेत आहेत. याला कारण आहे- "साहित्य मंडळा'ची दलाली ! ती थांबवली गेली पाहिजे ! आहे कुणा समीक्षकात एव्हढा दम ? -चतुरानन


।। पत्रकार ।।

उद्या, ६ जानेवारी रोजी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी स्थापन केलेल्या "दर्पण' या पाक्षिकाची १७६ वी जयंती आहे. ६ जानेवारी १८३२ रोजी त्यांनी हे मराठीतील पाहिले पाक्षिक सुरू केले होते. दर्पण वृत्तपत्र सुरू झाले त्या वेळी ब्रिटिशांचे शासन होते. सरकारचे नियंत्रण ही त्यावेळी कडक होते. नि:स्पृहपणे वृत्तपत्र चालविण्याचा तो काळ नव्हता तरीही त्यांनी वृत्तपत्राचा प्रारंभ जनकल्याणासाठी केला. लोक प्रबोधन, स्त्री शिक्षण सुधारणा, आणि सामाजिक सुधारणेचा वसा घेऊन त्यांनी पत्रकारिता केली. आज हीच पत्रकारिता "उद्योगा'च्या नावाखाली अनेक "उद्योग' करू लागली आहेत. आज जांभेकर असते तर त्यांनी अनेक वृत्तपत्रे बंद करण्यासाठीच चळवळ केली असती. देशात अनाचार, भ्रष्टाचाराचा महापूर आला असताना आजची वृत्तपत्रे त्या पूरातच हात धुऊन, गब्बर पैसेवाले होत आहेत. पोलिस, प्रशासन आणि पुढारी यांचेशी हातमिळवणी करून दोन्ही हातांनी, अनेक पानांनी, अनेक कॉलमांनी, भरपूर स्त्रीयांची बीभत्स व रुचिहीन चित्रे देऊन लुटत आहेत. आजचे पत्रकार, अपवाद सोडले तर, पेंढारी बनले आहेत, ध्येयापासून चळले आहेत; म्हणूनच समाज ढासळतो आहे विद्वान आणि मूर्ख यामध्ये अंतर असलेच पाहिजे, परंतु जेव्हा विद्वानच मूर्ख बनतो, तेव्हा मूर्ख ही दिग्द्मूढ होऊन त्या कडे पहात राहतो.बहुरूपी शब्द

प्रदक्षिणा : "दक्षिणा' में "प्र' उपसर्ग लगा कर "प्रदक्षिणा' शब्द बना है, जिस का अर्थ है- दक्षिण की ओर स्थित. वैसे इस का शब्दकोशगत अर्थ है- देवता की मूर्ती या किसी अन्य पवित्र स्थान के प्रति भक्ति व श्रद्धा प्रकट करने के उद्देश्य से उस के चारों ओर इस प्रकार चक्कर लगाना कि वह मूर्ति या स्थान बराबर दाहिनी ओर रहे. इस का ही पर्यायवाची शब्द परिक्रमा है. इस प्रयोजन के लिए देवालयों में गोल या वर्गाकार एक गली सी बनी होती है जिस में से गुजर कर भक्त लोग सिर नवा कर (या हाथ जोड़ कर) प्रतिमा की प्रदक्षिणा करते है."दक्षिणा' शब्द के अंतर्गत बताया गया है कि यज्ञ में साधारणतया दक्षिणा रूप में दुधारू गाएं की प्रथा प्रचलित थी. ये गायें यज्ञमंडप की वेदी के दक्षिण भाग से उत्तर की ओर लाई जाती थीं अर्थात इन गायों को एक प्रकार से वेदी की प्रदक्षिणा करनी पड़ती थी. इस कारण देवमूर्ती के चारों ओर (दक्षिण से उत्तर की ओर हो कर) चक्कर लगाने के लिए "प्रदक्षिणा' शब्द रूढ़ हो गया.

- शरद चंद्र पेंढारकर


hindi story, nagarsanket

कलकत्ते में एक महिला सम्मेलन हो रहा था. सरोजिनी नायडू इस सम्मेलन में सभापति के रूप में आमंत्रित थी. आपसी परिचय के बाद भाषण देने और अपने विचार रखने का कार्यक्रम आरंभ हुआ.
सरोजिनी नायडू को यह देखकर बहुत अचंभा हो रहा था कि कोई महिला उर्दू में भाषण देती तो कोई हिंदी या बंगला में, साथ ही दूसरों के विचारों और उन की भाषा में गलतियां निकालती. अभी कुछ ही देर हई थी कि कार्यक्रम की संचालिका उन के पास आ कर बोली, "मैडम घर से आप के लिए फोन आया है, आप का बच्चा बहुत रो रहा है. वह आया से चुप नहीं हो रहा. आप घर जाइए.'
सरोजिनी नायडू उठ खड़ी हुईं और बोली,"जाने से पहले आया से यह जरूर पूछ लूं कि मेरा बच्चा किस भाषा में रो रहा है,' यह सुनते ही सी उपस्थित महिलाएं अपने भाषाविवाद पर शर्मिंदा हो गईं और महान भारतीय भाषा प्रेमी सरोजिनी नायडू मुसकराती हुई चली गईं.


nagarsanket letter

बोलकी पत्रं

"नगरसंकेत' चा अंक मिळाला. आपण माझ्या विषयी भरभरून लिहिल्याचे वाचून मन भरून आले. माझ्या थोड्याफार कार्याविषयी इतकं काही वाटत असेल याची मला सुतराम कल्पना नव्हती. वाचून मन भारावलं, आणि क्षणभर वाटलं आपण स्वप्नात तर नाही ना ? कधी कधी काही आंबटशौकीन रसिक आपल्या आवडत्या संगीतज्ञानाबद्दल फुगवून बरंच काही लिहीत असतात. पण आपले तसे नाही. आपल्या लिखाणावरून आपण मर्मज्ञ आहात तसेच उत्तम रसिकही आहात याची मनोमन खात्री पटते. आणि अशा मर्मज्ञ रसिकाकडून झालेली वाखाणणी वास्तवाला धरूनच असणार हे सांगायला नकोच. म्हणूनच आपण मला भगीरथपदी नेऊन ठेवलेत, याचा अपरिमित आनंद होतो, आणि संगीत क्षेत्रांत यापुढे आपण बरंच काही केलं पाहिजे अशी उर्मी देण्यास आपला लेख स्फूर्तीदायी, चैतन्यदायी ठरत आहे. यासाठी आपले आभार कसे मानावेत तेच कळत नाही. आपणाला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच. आपल्या शुभ चिंतनाने यापुढे माझ्या हातून असेच संगीतोपयोगी कार्य करण्यास ईश्वर मला प्रेरणा देवो एवढीच ह्या जगननियंत्याशी प्रार्थना.

बबनराव हळदणेकर, मुंबई

----०००----

मी "नगर संकेत'चा नियमित वाचक आहे. आपल्या साप्ताहिकांत साहित्यचर्चा, परिचय, नाटक, मिर्झा गालिब, काव्य, शब्दोत्पत्ती, कुंडली दर्शन असे अनेक प्रकारचे ज्ञानदर्शन घडून येते. आनंद वाटतो.श्रद्धा अंधश्रद्धा प्रश्न गौण आहे. पण थोरामोठ्यांची कुंडलीदर्शन फारच वाचनीय आहे. त्यातून निखळ आनंद मिळतो.
मी आपणास विनंती करतो की संत तुकाराम, गाडगेबाबा, छ. शाहुमहाराज कोल्हापूर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भाऊराव पाटील या थोर व्यक्तीचे कुंडली दर्शन घडवावे. आनंद वाटेल.

कृ. म. होले, पुणे

----०००----

सोबत १०५०/- चा धनादेश पाठवीत आहे त्याचा स्वीकार व्हावा. बरेच महिन्यापूर्वी आपणांस पत्रिका न पाठवणेसाठी लिहिले होते, तरीही एक कार्य म्हणून आपण, न जुमानता संकेत देतच राहिलात, आपले कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अस्तू.आपली चिकाटी, जिद्द, ध्येयाने प्रेरित होऊन काम करणेची पद्धत वाखाणण्यासारखीच आहे. आजच्या तरुणांनी जर हे लक्षांत ठेवून कार्य केले तर नक्कीच सफलतेकडे जाऊ शकतील.आपणांस सदैव शुभ चिंतणारा.

नारायण ल. बोडस, आचार्य, मुंबई.


----०००----


तुमचा नगर संकेतचा प्रत्येक अंक बारकाईने वाचतो. यावेळच्या अंकात बाह्मण वादावर तुम्ही केलेलं विवेचन औचित्यपूर्ण आहे. आणि तितकंच सकारात्मक आहे. मी स्वत: प्रागतिक विचारांचा असल्यामुळे मला ब्राह्मणवृत्ती अजिबात पसंत नाही. कुमार केतकरांना झालेली मारहाण ही निषेधार्थच आहे. दुर्दैवानं अजून बहुसंख्य ब्राह्मणांची जुनी मतं तशीच बुरसटलेली आहेत. त्यामुळे ब्राह्मणेतर लोकही तितक्याच टोकाला जाऊन ब्राह्मणांबद्दल चांगलं बोलत नाहीत. माझे लहानपणापासूनचे अनेक ब्राह्मणेतर मित्र आहेत. मागसवर्गीय मित्र आहेत. मी त्यांच्याशी नीट वागलो त्यामुळे ही सगळी ब्राह्मणेतर मंडळी मला आता वडिलांप्रमोण मानतात. ब्राह्मणांनी अहंकार सोडायला पाहिजे. आणि ब्राह्मणेतरांनी ब्राह्मणांचा द्वेष करणं हे देखील बंद व्हायला पाहिजे. मुळातच मला जातीय संमेलनं मान्य नाहीत. ब्राह्मण, मराठी, सी.के.पी तसेच अन्य "जातीय संमेलनं' भरवतात हे मला समाज एकसंघ होण्याच्या दृष्टीनं अयोग्य वाटतं. तुमच्या परिपक्व विचारांचं सर्वांनी मनन करावं असं मला मनापासून वाटतं. ब्राह्मणांना अहंगंड आहे आणि ब्राह्मणेतरांना न्यूनगंड आहे तो कसा दूर करावा याबद्दल तुम्ही तुमचं मत मांडावं.
प्र.चिं. शेजवलकर, पुणे.
(उत्तर- गुणांवरूनच जातिप्रथा, मानावयाची झाल्यास, आपण मान्य केली पाहिजे, असे वाटते - प्र.संपादक)

----०००----


"दर्पण' व "मंदाश्री' पुरस्कार मिळाल्यानंतर आम्हांला अनेकांनी दूरध्वनीने, पत्राने आणि समक्ष भेटून अभिनंदन केले. त्या सर्वांचे आम्ही मन:पूर्वक आभारी आहोत. अनेकांची अभिनंदन पत्रे येथे देण्याचा मोह टाळून मुंबईच्या "धनंजय-चंद्रकांत' या दोन्ही दिवाळी अंकाचे संपादक श्री. राजेंद्र शंकरराव कुलकर्णी यांचे पत्र प्रातिनिधक स्वरूपात देत आहोत. - प्र. संपादक

दर्पण-साहित्य-पत्रकारिता पुरस्कार योग्य व्यक्तीला मिळाल्याचा मनापासून आनंद झाला. अभिनंदन. आपल्या पुढील वाटचालीस, कार्यक्रमांसाठी शुभेच्छा. प्रामाणिक हेतूंनी एकटा चालणाऱ्यांस नेहमीच अनेकांची साथ असते.आपला नगर संकेत, नियमित मिळतो. बहुतेक अंकांचा आल्याआल्याच फरशा पाडतो. आपले संपादकीय, डॉ. विजया वाड, गजानन वाटवे, लालन सारंग, अरुण फिरोदियांचा "झेंडा स्वातंत्र्याचा'- सर्व लेख वाचनीय झाले आहेत. "चतुरस्र' चिंतनीय असतं. महत्त्वाच्या गोष्टींची आपण न चुकता दखल घेता. याचं विशेष कौतुक. साप्ताहिक नगर संकेतच्या सर्व कुटुंबीयांस अगणित शुभेच्छा. क. लो. अ., वृद्धिंगत व्हावा.

राजेंद्र शंकरराव कुलकर्णी
संपादक- धनंजय, चंद्रकांत

Nagarsanket is first weekly marathi - hindi news web site, www.nagarsanket.com, Marathi Nesw, Marathi News Paper, Marathi Online News Paper, Marathi, Marathi Articals, Marathi Poem, Marathi Nagarsanket News, Hindi Nesw, Hindi News Paper, Hindi Online News Paper, Hindi, Hindi Articals, Hindi Poem, Hindi Nagarsanket News, Marathi Hindi,  Hindi Marathi, Maharashtra Marathi, Bruhan Maharashtra News, Prof. jawahar Mutha, Satyen Mutha, Hemant Mutha