marathi, marathi news paper, managarsanket news, nagarsanket, 

~mVå`m

 

समाजाभिमुख पत्रकारिता सदैव तळपतच राहील - प्रा. जवाहर मुथा

संस्थेस्या संघटकपदी डॉ. मिलिंद चवंडके यांनी नियुक्ती करण्यात आली. याप्रसंगी त्यांचा सत्कार करतांना संस्थेचेअध्यक्ष किसन हासे, उपाध्यक्ष प्रा. जवाहर मुथा, सहसचिव अजय जाजू, समन्वयक नरेंद लचके, ह.भ.प. अशोक महाराज कर्डिले व इतर मान्यवर.

 

अहमदनगर (प्रतिनिधी) - निर्भीड पत्रकारिता करणे कठीण होत असले तरी समाजाभिमुख पत्रकारिता सदैव तळपतच राहाल. मुद्रित व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांचा शासनावरील दबाव व समाजाभिमुख प्रभाव यामुळेच सामान्य जनतेचे प्रश्न सुटण्यास मदत होत असे उद्गार संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र मुंबईचे उपाध्यक्ष प्रा. जवाहर मुथा यांनी काढले. अहमदनगर जिल्हा संपर्क अभियानासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीच अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष किसन भाऊ हासे होते. या बैठकीसाठी संस्थेचे सहसचिव अजय जाजू, समन्वयक नरेंद्र लचके, संपर्क प्रमुख बाळासाहेब घोडके, दादासाहेब कोळसे, संजय सावंत, सुधीर पवार, सत्येन मुथा, राहुल राऊत, चंद्रकांत पालवे, हेमंत मुथा, रामाकांत बर्डे, मधुकर दिवाण, हरिभाऊ जपे, राजेंद्र जोशी, सुहास कुलकर्णी, शिरीष कुलकर्णी, मिलिंद चवंडके, बाळासाहेब शेटे आदी उपस्थित होते.प्रा. जवाहर मुथा पुढे म्हणाले की, पत्रकारिता हे समाजसेवेचे अतिशय प्रभावी माध्यम असून पत्रकार व समाज एकत्र आल्यास सार्वजनिक व सामाजिक प्रश्न शासनाला सोडवावेच लागतात म्हणून संपादक व पत्रकार सेवा संघ संस्थेचे पत्रकारांबरोबरच सामाजिक व शैक्षणिक कार्यकर्त्यांनाही सभासदत्वाची द्वारे खुली केली आहे. आचार, विचार, व्यवहार यामध्ये एकवाक्यता ठेवून जर कामकाज होत राहिले तर त्या समाजही बळ देतो. असे फार मोठे बळ या संथेस मिळत असल्याचे प्रा. मुथा यांनी नमूद केले.याप्रसंगी उपस्थितांना संस्था पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून सत्कार केला तसेच प्रा. डॉ. मिलिंद चवंडके यांनी अतिशय कठोर परिश्रमाने पीएच.डी. ही पदवी मिळविल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. या बैठकीत प्रा. मिलिंद चवंडके यांची अहमदनगर जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली.संपादक व पत्रकार सेवा संघ या संस्थेच्या वाटचालीविषयी विस्तरात्मक विचार मांडताना अध्यक्ष किसन भाऊ हासे म्हणाले की, आज महाराष्ट्रात पत्रकार, वृत्तपत्रे, संपादक, फोटाग्राफर, वृत्तपत्रविक्रेते यांच्या विविध संस्था असून या सर्व संस्थांशी वैचारिक संपर्क व समन्वय साधून आली संस्था समाजात लोकप्रिय होत असताना शासनालाही काही उपक्रम सादर करणार आहे. समविचारी व कृतिशील व्यक्तींचे संघटन म्हणून संस्थेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. वर्षभरात सर्व जिल्हा कार्यकारिणी आणि राज्य कार्यकारिणीची निर्मिती होऊन राज्यातील समाज, शासन व प्रसारमाध्यम क्षेत्राचा समन्वय घडवून आणणारी सर्वांत मोठी संस्था असा नावलौकिक या संस्थेस मिळेल असा विश्वास श्री. हासे यांनी व्यक्त केला. संस्थेचे उपाध्यक्ष व मार्गदर्शक प्रा. जवाहर मुथा हे पत्रकार व साहित्यिक म्हणून राज्यात प्रसिद्ध असून त्यांचे मार्गदर्शनाखाली प्रसारमाध्यमांतील प्रश्न सोडविण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू असा विश्वासही श्री. हासे यांनी व्यक्त केला. प्रसिद्ध कीर्तनकार व दिंडी या त्रैमासिकाचे संपादक ह.भ.प. अशोकानंद महाराज कर्डीले यांनी संपादित केलेल्या दिंडी विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.संस्थेच्या वाटचालीस भरीव सहकार्य करण्याचे निश्चित करून प्रा. चवंडके, चंद्रकांत पालवे, राहुल राऊत, शिरीष कुलकर्णी, श्री. कुलकर्णी, सत्येन मुथा यांनी आपले विचार प्रगट केले. सत्येन मुथा यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
संस्थेचे सभासदासाठी कृपया खालील ठिकाणी संपर्क साधावा.
श्री. किसन हासे (अध्यक्ष), मो. ०९८२२०३९४६०, प्रा. जवाहर मुथा (उपाध्यक्ष) मो. ०९४२२२२०२८०, श्री. अरुण कुलकर्णी (मुंबई) मो. ०९३२३४०२६९१


प्रा. जवाहर मुथांना अशोक मित्र पुरस्कार

ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार व साप्ता. नगर संकेतचे प्रमुख संपादक प्रा. जवाहर मुथा यांना आग्रा येथे झालेल्या अशोकस्तंभ लोकर्पण सोहळ्यात "अशोक मित्र' पुरस्कार प्रदान करण्यात आला. सम्राट अशोक सर्वांगीण विकास समितीतर्फे हा पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष श्री. अशोक शिलवंत यांनी प्रा. रतनलाल सोनग्रांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटक श्री. प्रशांत पगारे यांच्या उपस्थितित हा पुरस्कार दिला. स्मृतिचिन्ह, मानपत्र, पुष्पहार व शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रा. जवाहर मुथांवर पुणे विद्यापीठात त्यांच्या हयातीत पीएच्.डी. संपन्न झाली व सम्राट अशोकांवर त्यांनी ज्या कविता लिहिल्या त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.


कवि दत्ता हलसगीरांची "नगर संकेत'ला भेट

सोलापूरचे कवि श्री. दत्ता हलसगीकर यांनी महाराष्ट्रातील एक मात्र साहित्य विषयक साप्ताहिक नगर संकेतच्या कार्यालयास भेट देऊन नगर संकेत करीत असलेल्या साहित्यविषयक कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रमुख संपादक प्रा. जवाहर मुथा यांनी त्यांचे शाल-श्रीफळ देऊन स्वागत केले. संपादक श्री. सत्येन मुथा, सहसंपादक श्री. हेमंत मुथा, श्री. चंद्रकांत पालवे, श्री. शहापूरकर त्यावेळी उपस्थित होते. "नगर संकेत'चे कार्य महनीय आहे. मराठी सारस्वतांचे ते एकमात्र साप्ताहिक असल्याने त्याचा प्रत्येक अंक संग्राह्य असतो, असे यावेळी ते म्हणाले. सत्येन मुथा यांनी आभार मानले.


विश्वकोशाचा तिसरा खंड प्रकाशित
वेबसाइटवरही पाहता येणार कोश

मराठीत उपलब्ध असलेल्या ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावे आणि कालानुरूप ज्ञानप्रवण व्हावे यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. मराठी विश्वकोश हा त्याचाच प्रयत्न. आता विश्वकोश ई-आवृत्तीत आल्याने हे स्वप्न सत्यात उतरत आहे, असे सांगत ज्येष्ठ साहित्यिक राजाध्यक्ष यांनी मराठी विश्वकोशाच्या तिसऱ्या खंडाचे प्रकाशन केले. ज्ञानाची ही ओंजळ जपून वापरा, असे भावनिक आवाहनेही त्यांनी केले.
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी संपादित विश्वकोशाच्या तिसऱ्या खंडाचा लोकार्पण सोहळा नुकताच के. जे. सोमय्या कॉलेजमध्ये पार पडला. यावेळी डॉ. राजाध्यक्ष यांच्यासमवेत विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्ष डॉ. विजया वाड, मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख उपस्थित होत्या. यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. वाड यांनी मराठी विश्वकोशाच्या वेबसाइटला २२ देशांतील १ लाखांहून अधिक वाचकांनी भेट दिल्याची माहिती दिली. विश्वकोश हा फक्त कोशात न राहता जगभरातील लोकांच्या ज्ञानात भर घालण्यासाठी विश्वाशी जोडला गेला पाहिजे. अशी भूमिकाही त्यांनी मांडली. सी-डॅकने या प्रकल्पात दिलेल्या सहकार्यासाठी संचालक महेश कुलकर्णी यांचेही डॉ. वाड यांनी आभार मानले."ज्ञानाच्या अमर्याद सागरातून आत्तापर्यंत ३ खंड बाहेर आले असून १८ खंड येणार आहेत. या खंडांमुळे जगभरातील मराठी वाचकांच्या माहितीत सातत्याने भर पडत राहील" असा विश्वास डॉ. स्नेहलता देशमुख यांनी व्यक्त केला.
विश्वकोश
www.marathivishwakosh.in या वेबसाइटवर पाहता येणार आहे. खंडाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सोमय्या कॉलेजच्या प्राचार्य डॉ. सुधा व्यास, कॉलेजच्या विश्वस्त लीलाबेन कोटक, डॉ. नेहा राजपाल, अविनाश तांबे, दिनकर गांगल, अशा कुलकर्णी आदी उपस्थित होते.


देशाच्या इतिहासलेखनात पहिल्यांदाच मराठी दस्तऐवजांचा आधार !

मराठी बखरी, मराठी दफ्तरे-रुमाल या ऐतिहासिक नोंदी, स्वातंत्र्यपूर्व काळातील मराठी वर्तमानपत्रे... अशी इतिहासाची भरपूर साधने उपलब्ध असली तरी देशाचा इतिहास लिहिताना त्याकडे पूर्णपणे दुर्लक्षच झाले होते. आता पहिल्यांदाच या मराठी साधनांकडे गांभीर्याने लक्ष देण्यात आले असून, देशपातळीवर इतिहासासाठी त्यांचा पहिल्यांदाच वापर करून घेण्यात येणार आहे. त्यांपैकी निवडक दस्तऐवजांचे भाषांतर करून ते इतिहासलेखनासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मराठीबरोबरच बंगाली व इतर प्रादेशिक भाषांमधील साहित्यालाही हे भाग्य मिळणार आहे.भारतीय ऐतिहासिक संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ. सव्यसाची भट्टाचार्य यांनी दिलेल्या खास मुलाखतीत ही माहिती दिली. प्रादेशिक भाषांमधील पुरावे उपलब्ध झाल्यामुळे भारतीय इतिहास संशोधनावरील ब्रिटिशांचा पगडा कमी होईल व खराखुरा इतिहास लोकांसमोर येईल, असा विश्र्वासही भट्टाचार्य यांनी व्यक्त केला. भारतीय स्वातंत्र्याबद्दल १८५७ च्या उठावाला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल गेल्या वर्षभरापासून देशभर प्रदर्शने व चर्चासत्रे आयोजित करण्यात येत आहेत. या निमित्ताने १८५७ च्या उठावाबाबत संशोधन व प्रादेशिक भाषांमधील महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचा प्रकल्पही हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडून एक कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात १८५७ च्या उठावासंबंधीत मराठी व बंगाली भाषांमधील नोंदीचे इंग्रजीत भाषांतर करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्या अंतर्गत मराठी भाषेतील सातारा, सावंतवाडी, कोल्हापूर येथील रुमाल-दफ्तरांमध्ये असलेल्या ऐतिहासिक नोंदी, ज्ञानप्रकाशसारखी वृत्तपत्रे, ऐतिहासिक काळात गुप्तपणे वितरित झालेली पत्रके असा अनेक दस्तावेज संकलित करण्याचे काम सुरू आहे. याशिवाय मुंबई येथे ब्रिटिशांविरोधात झालेला कट व त्याबाबतचे पुरावे हाती येत आहेत. हे काम मुंबई विद्यापीठात इतिहासअभ्यासक जे. व्ही. नाईक यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. ते येत्या काही महिन्यांमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. हे पुरावे इतिहासकारांना उपलब्ध करून दिले जाईल, असे भट्टाचार्य यांनी सांगितले. देशाचा इतिहास लिहिताना आत्तापर्यंत इंग्रजी साहित्याचाच आधार घेण्यात आला आहे. त्यातही सरकारी व ब्रिटिशांनी लिहून ठेवलेल्या नोंदीचाच प्रमुख वाटा आहे. या नोंदी सहज उपलब्ध होत असल्याने इतर नोंदी फारशा हाताळण्यात आल्या नाहीत. त्या खोट्या नाहीत, पण त्या पक्षपाती असण्याची शक्यता आहे. आता प्रादेशिक नोंदी उपलब्ध झाल्याने खराखुरा इतिहास मांडणे शक्य होईल, असे मत भट्टाचार्य यांनी व्यक्त केले. मराठी व बंगाली भाषांमधील ऐतिहासिक साहित्यानंतर पुढच्या टप्प्यात इतर भाषांमधील साहित्यसुद्धा भाषांतरित करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.


ना. सुशिलकुमार शिंदेच्या हस्ते
"वाङ्मयीन कर्तृत्व' व "साप्ता. नगर संकेत' विशेषांकाचे प्रकाशन

jawahar mutha, sushilkumar shinde, maharashtra mandal, nagarsanket, bookjawahar mutha, sushilkumar shinde, maharashtra mandal, nagarsanket, newspaper

"साप्ता. नगर संकेत' ने या संमेलन प्रसंगी प्रकाशित केलेल्या विशेषांकाचे व "साप्ता. नगर संकेतचे वाङ्मयीन कर्तृत्व' या सत्येन व हेमंत मुथा यांनी संपादित केलेल्या पुस्तिकेचे आणि साप्ता. नगर संकेत च्या बृहन्महाराष्ट्र विशेषांकाचे प्रकाशन या वेळी मा. ना. सुशिलकुमार शिंदे यांच्या हस्ते अत्यंत आस्थेवाईक व सौहार्दपूर्ण वातावरणात करण्यात आले. ना. शिंदे यांनी प्रमुख संपादक प्रा. जवाहर मुथांचा स्मृतिचिन्ह देऊन या वेळी बृहन्महाराष्ट्र मंडळातर्फे गौरव करण्यात आला. प्रा. मुथा यांनी अहमदनगर येथे होणाऱ्या नियोजित साहित्य संमेलनाची कल्पना देऊन त्यांना आग्रहपूर्वक निमंत्रण दिले ते ना. सुशिलकुमार शिंदे, खा. मनोहर जोशी व सुमित्रा महाजन यांनी सहर्ष स्वीकारले.


२० भाषांचा पंडित संकेत लिमये

पुणे- आजच्या जमान्यात सर्वच जण इंग्रजी शिक्षणाचा अट्टहास करीत असताना पुण्याचा संकेत श्रीराम लिमये या तरुणाने वीस देशी-परदेशी भाषा शिक्षणाचा अध्याय आत्मसात केला आहे. उर्दू, गुजराथी, कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलगु, असामी, बंगाली, उडीसा, अरबी, फारसी, सिंधी, जपानी, इंग्रजी, मारवाडी या त्या भाषा आहेत. जपानी भाषेची चित्रलिपी चीन सारखीच आहे. ती त्याने आत्मसात केली आहे. हिरागाना आणि काताकाना या दोन्ही चित्रलिप्या त्याला येतात. त्याशिवाय पंजाबी भाषा त्याने अवगत करून घेतली आहे. वयाच्या बाराव्या वर्षापासून उर्दू शिक्षणाकडे त्यातील चित्रलिपीमुळे तो वळला व त्यानंतर प्रत्येक भाषा त्याला खुणावू लागली व तो ती आत्मसात करून घेऊ लागला. रोज एक तास तो भाषा-शिक्षणासाठी देत असे. बहुभाषा-पंडित असलेल्या संकेत लिमयेची कामगिरी लक्षणीय आहे. मानसशास्त्र हा विषय घेऊन तो बी.ए. झाला आहे. भावी जीवनात "नगर संकेत' च्या वतीने शुभेच्छा !


आदिलशाहीतील फारसी फर्माने मराठीत

सतराव्या शतकातल्या विजापूरच्या आदिलशाहीची फर्माने ही फारसी भाषेतील शिकस्त लिपीत असल्यामुळे अभ्यासकांना तिचा म्हणावा तितका उपयोग करून घेतला आलेला नाही. अशी एकंदर ५० फर्माने आता थेट मराठीमध्ये आणण्याचे काम इतिहासाचे अभ्यासक निनाद बेडेकर, शिवचरित्रकार गजानन मेहेंदळे, डॉ.रवींद्र लोणकर यांनी पूर्ण केले आहे. मराठीत अशा प्रकारचे काम प्रथमच होत असून लवकरच ते आता पुस्तकरूपानेही उपलब्ध होणार आहे. यासंबंधी बोलताना बेडेकर म्हणाले की, भारत इतिहास संशोधन मंदिरात आदिलशाही फर्मानांचा मोठा खजिनाच आहे. फारसीतल्या शिकस्त लिपीचा अभ्यास नसल्यामुळे इतिहासाचे अनेक अभ्यासक या अस्सल फर्मानांमध्ये काय लिहिले आहे याबाबतीत अनभिज्ञ राहिले आहेत. सुरुवातीला पन्नास फर्माने निवडून या कामाला आम्ही तिघांनी सुरुवात केली व सलग चार वर्षांच्या परिश्रमानंतर हे काम पूर्णत्वाला आले. वाचलेल्या या फर्मानांचे स्वतंत्र फोटो काढून त्याचे पर्शियन भाषेतील मूळ मजकूरही पुस्तकामध्येही मुद्दाम आहे तसाच ठेवला आहे. त्या आधारेच सोबतच्या विस्तृत मराठी टिपा प्रत्येक फर्मानासोबत जोडल्या आहेत.यानिमित्ताने ओळीवार शिकस्त लिपीतले पर्शियन टेक्सचा अभ्यास करता येईल. तसेच त्याचा मराठी अन्वयार्थ कसा लावला आहे हेही शोधता येईलच पण त्यापेक्षाही आदिलशाही व्यवस्थापनाची अनेक अज्ञात अंगे दाखवणारी ही फर्माने नव्या माहितीवर तसेच नव्या संशोधनावर प्रकाश टाकतील अशी आशाही बेडेकरांनी बोलून दाखवली.


पेट्रो शेमाखा : जर्मन तरुणी, मराठी नाटककार

petro, marathi drama, marathi news, nagar sanket, nagarsanketज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांनी कालिदासाचे "शाकुंतल' नाटक थेट जर्मनीमध्ये सादर केले होते, पण पुण्याच्या सांस्कृतिक वातावरणापासून प्रेरणा घेऊन दोन वर्षांपासून पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या पेट्रा शेमाखा या नाट्यशास्त्राच्या तरुण जर्मन विद्यार्थिनीने चक्क मराठीतच नाटक लिहिले असून तीच बसवत असलेल्या या नाटकाचा पहिला प्रयोग जानेवारी मध्ये सेनापती बापट रोडजवळील "कलाछाया' येथे झाला.

अस्खलित मराठी बोलणाऱ्या पेट्रोसाठी मराठी नाटक हा विषयही नवीन नाही. यापूर्वी तिने विजय तेंडुलकरांच्या "शांतता, कोर्ट चालू आहे' या नाटकातील बेणारे बाईंची गाजलेली भूमिकाही एकपात्री पद्धतीने सादर केली होती. जर्मनीतील युनिव्हर्सिटी फॉर म्युझिक ऍण्ड थिएटर येथे नाट्यशास्त्राची पदवी घेतलेल्या पेट्रोने भांडारकर प्राच्यविद्या संस्थेतील डॉ. सुचेता परांजपे यांच्याकडून मराठीचे धडे गिरवले आहेत.प्रयोगशील नाटकांसाठी काम करणाऱ्या "जागर' या संस्थेसाठी पेट्रोने सव्वादोन तास लांबीचे हे नाटक बसवले आहे. त्यात ऋता पंडित, संतोष कोल्हटकर, मंजिरी पेठे, हर्षल उखंडे, महेश भालेराव इत्यादी २३ जणांच्या भूमिका आहेत. त्याचे नावही "या नाटकाचे नाव फक्त तुम्हालाच माहिती आहे' असे सूचक ठेवण्यात आले आहे ! त्याचे सुरुवातीचे तीन प्रयोग "कलाछाया' येथेच ठेवण्यात आले होते. मुंबईच्या मॅक्ससम्युलर भवननेही पेट्रोच्या या कामगिरीची दखल घेतली आहे.या प्रयोगांना मिळणारा प्रतिसाद पाहून पुढील प्रयोग कुठे करायचे ते ठरवता येईल, असे पेट्राने सांगितले. ती म्हणाली की, यापूर्वी एक जर्मन नाटकही आपण लिहिले आहे. माझे हे पहिले मराठी नाटक म्हणजे माणसाने माणसाचा घेतलेला शोध आहे. नाटक पुण्यातच सुचल्यामुळे ते इथे सादर करावे असे वाटले.या नाटकात अनेक प्रवेश असले तरी त्याची एकमेकांशी खास तार्किक सुसंगती आहे, असे त्यातील ऋता पंडित आणि संतोष कोल्हटकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, या नाटकाच्या नावापासून ते सादरीकरणापर्यंत त्यातील शब्द, आशय आणि मांडणी याबाबत पेट्रा अतिशय काटेकोर आहे. आमच्या तालमीही अतिशय विचारपूर्वक घेतल्या जात असून नाटक बसवण्याच्या नेहमीच्या पद्धती बाद केल्या आहेत. रसिकांना हे नाटक नक्की आवडेल.


'गुगल'वर २०० वर्षापूर्वीच्या बातम्या

न्यूयॉर्क- "गुगल' या वेबसाईटने अलीकडेच काही कॉपीराईट नसलेली चांगली पुस्तके वेबसाईटवर उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. आता "गुगल'ने एक नवे पाऊल उचलले आहे. या वेबसाईटवर आता लवकरच २०० वर्षांपूर्वीच्या बातम्याही पाहायला मिळणार आहे. या साईटवर जुन्या काळातील दैनिकांचा एक संग्रह उपलब्ध होणार आहे. या योजनेत अमेरिकेचे "न्यूयॉर्क टाइम्स' आणि ब्रिटनचे "द गार्डियन' यांचा समावेश आहे. याशिवाय अन्यही काही दैनिकांची आणि वृत्तसंस्थांची मदत घेतली जाणार आहे. या योजनेचा कर्ताधर्ता आहे अनुराग आचार्य. त्याने सांगितले, या माध्यमातून इतिहास आपल्याला त्या काळातच जाऊन पाहता येईल. अभ्यास, मनोरंजन आणि कुतूहल अशा सर्वच प्रकार हा उपक्रम वैशिष्टपूर्ण आहे. या बातम्यांबरोबरच त्यांच्या प्रकाशनाची तारीखही दिली जाईल. इतिहासातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींच्या त्या काळात प्रसिद्ध झालेल्या बातम्या आपल्याला पाहता येतील. अगदी सतराव्या शतकाच्या मध्यातीलही बातम्या यामध्ये असतील.


टागोरांच्या कथा हिब्रू भाषेत

marathi news, nagar sanket, nagarsanket, nobal award, ravindranath togarगुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या कथांचा अनुवाद हिब्रूमध्ये करण्यात आला असून इस्त्रायल येथील सार पब्लिशिंग हाऊसतर्फे तो नुकताच प्रकाशित करण्यात आला. भारताचे इस्त्रायलमधील राजदूत अरूणकुमार सिंग यांच्यासह अनेक भारतीय संस्कृतप्रेमी या समारंभाला उपस्थित होते.

"एप' या नावाने प्रकाशित करण्यात आलेल्या हिब्रूमधील या कथासंग्रहात टागोरांच्या सर्व कथांचा अनुवाद झाला आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना सार पब्लिशिंग हाऊसचे संचालक सार गनोच म्हणाले की, रवींद्रनाथ टागोर हे भारतामधील सर्वोत्कृष्ट कथाकारांपैकी एक असून त्यांना थोर तत्त्ववेत्ते म्हणूनही ओळखले जाते. भारतातील स्त्रीजीवनाविषयीचे अत्यंत मार्मिक चित्रण या कथांमधून झाले आहे. त्यामुळेच टागोरांच्या पहिल्या अनुवादित पुस्तकासाठी आम्ही "स्त्री' हेच पुस्तक निवडले. त्यानंतर टागोर यांचे "मिस्टिक मूडस' व "ब्युटिफूल डायव्हर्जंट फेस ऑफ इंडिया' ही अनुवादित पुस्तकेही प्रकाशित होतील. तिसऱ्या अनुवादित पुस्तकात भारताची विचारसरणी दर्शविणारी अनेक छायाचित्रे असून त्याखाली महात्मा गांधी आणि टागोर यांची वचनेही उद्धृत करण्यात येणार आहेत.


Nagarsanket is first weekly marathi - hindi news web site, www.nagarsanket.com, Marathi Nesw, Marathi News Paper, Marathi Online News Paper, Marathi, Marathi Articals, Marathi Poem, Marathi Nagarsanket News, Hindi Nesw, Hindi News Paper, Hindi Online News Paper, Hindi, Hindi Articals, Hindi Poem, Hindi Nagarsanket News, Marathi Hindi,  Hindi Marathi, Maharashtra Marathi, Bruhan Maharashtra News, Prof. jawahar Mutha, Satyen Mutha, Hemant Mutha