nagarsanket, nagar sanket, logo, art, sahity, book, news, paper`mo{Vf

 

astrologycal, astrology, kundali, prof. jawahar mutha, jawahar mutha, astro, nagarsanket, marathi

 

"ज्योतिष' या विषयाला केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यता देऊन पाच वर्षे झापली आहेत; परंतु महाराष्ट्रातील कोणत्याही वृत्तपत्राने पाठपुरावा न केल्याने हा शास्त्रीय विषय तसा दुर्लक्षितच राहिला आहे. पुढील काळात तो तसा राहू नये म्हणून या आठवड्यापासून प्रत्येक अंकात एका पत्रिकेचे विश्लेषण दिले जाईल. वाचकांच्या पसंतीस हे ही सदर नक्की उतरेल याचा विश्वास वाटतो. महाराष्ट्र ज्योतिष संशोधन केंद्रातर्फे, अर्थातच प्रा. जवाहर मुथाच, हे ही सदर लिहितील. चतुरस्र, चतुरानन, जे.एम्., प्रीति घोष या विविध नावांनी त्यांनी सदरांचे लेखन केले व करीत आहे. या सदरासाठी ते नाव न घेता फक्त महाराष्ट्र ज्योतिष केंद्राचेच नाव घेतील !- संपादक


nagarsanket, kundli, shirish pai

 

शिरीष पै

१५ नोव्हेंबर १९२९ रोजी पुणे येथे सकाळी ९.१५ वा. जन्म झालेल्या आचार्य अत्रे यांच्या कन्या शिरीष पै यांच्या पत्रिकेचा अभ्यास केला तर असे दिसून येते की दशमेश व लाभेश बुध-शुक्राची युती लाभस्थानात झाल्याने मित्र-कर्माचा राजयोग झाला आहे. पंचमात चंद्र असून त्यावर शुक्र व बुधाची पूर्ण दृष्टी असल्याने त्या आत्यंतिक काव्य-प्रवृत्तीच्या मनाने अधिगृहीत झाल्या आहेत. काव्यात्मकता, ऋजुता, नम्रता, सच्छीलता हे त्यांचे विशेष व्यक्तिमत्त्व ! लग्नात शनि हा गुरूच्या, मित्र राशीत असल्याने त्या न्यायप्रवण ही झाल्या ! चंद्र, शुक्र, बुध व रवि हे चार ग्रह त्यांच्या बाबतीत अत्यंत प्रभावपूर्ण आहेत. चतुर्थात असलेला हर्षल त्यांना अकल्पितपणे उत्तम मानसिक स्वास्थ्य देणारा ठरला आहे. शुक्र-नेपच्यून लाभयोग व लाभेष लाभात हे दोन योग ही लक्षणीय आहेत.

nagarsanket, kundli, mangesh

मंगेश पाडगावकर

पाहिला केशवसुत पुरस्कार नुकताच प्राप्त करणारे कवीराज मंगेश पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सकाळी ५ वा. ३० मि. नी रत्नागिरी जिल्ह्यातील वेंगुर्ले येथे कुंभ लग्नावर झाला. त्यांच्या पत्रिकेत भाग्येश शुक्र व लाभेश गुरू यांची युती पराक्रमस्थानात आहे. हा फार मोठा राजयोग आहे. पुन्हा लग्नेश शनि हा गुरूच्या राशीतून गुरू-शुक्राशी नवपंचम योग करीत आहे व लग्नात रवि सारखा तेजस्वी ग्रह आहे. रवि, गुरू, शुक्र व शनि त्यांना राजयोग प्रदान करीत आहेत. चंद्र-बुधाची युती काव्यात्मकता, प्रतिभा व कल्पना यांना उत्तेजन व प्रोत्साहन देणारी आहे. तसेच दशमेश मंगळ पंचमात असल्याने त्यांची सूक्ष्म-निरीक्षणशक्ती काव्य रचनेत अत्यंत प्रभावी ठरली आहे. पुन्हा शुक्र-नेपच्यूनचा नव-पंचम योग ही लक्षणीय असाच आहे.

 

nagarsanket, kundli, ambedkar

डॉ. भीमराव रावजी आंबेडकर

भारतीय घटनेचे शिल्पकार, दलितोद्धारक व बौद्ध धर्म प्रचारक डॉ. आंबेडकरांचा जन्म १४ एप्रिल १८९२ रोजी सकाळी झाल्याची नोंद आहे. मिथून लग्नावर जन्मलेल्या डॉ. आंबेडकरांच्या कुंडलीत राजयोगांची रेलचेल आहे. भाग्येश शनि व दशमेश गुरु हे दोन्ही केंद्रात असून एकमेकांच्या दृष्टीत आहे व हा फार मोठा राजयोग आहे. शनि मित्रराशीत असून गुरु स्वगृहीचा आहे. लग्नेश बुध लाभस्थानात असल्याने त्यांचा मित्र परिवार प्रचंड होता. पुन्हा लाभेश मंगळ हा केंद्रात आहे. पंचमस्थान हे बुद्धीचे कारकस्थान असून येथे चंद्र-हर्षल युतीमध्ये आहे. त्यामुळे त्यांना तीव्र बुद्धिमत्ता लाभली. संशोधन व व्याख्येचे हे मेरुमणी होते. सातत्याने अभ्यास करून जगात हे पुढे आले. चंद्र, गुरु, शनि, मंगळ व बुध या ग्रहांनी त्यांना राजयोग सद्दष्य फले दिली.


चतुर्थस्थानाचे महत्त्व


कुंडलीमध्ये बारा स्थाने आहेत, सर्वांत महत्त्वाचे स्थान कोणते?- असा प्रश्न एका पृच्छकाने मला फोनवर विचारला. क्षणाचाही विलंब न करता मी म्हणालो, "चतुर्थस्थान !' आणि प्रश्न विचारणारा चकीत झाला, म्हणाला, "काय म्हणता ? अहो, मला आत्तापर्यंत सर्वांनीच लग्नस्थान महत्त्वाचे असते, असे सांगितले. फक्त तुम्हीच पहिले भेटला !'- मी हसलो व फोन ठेवून दिला.चतुर्थस्थान हे लग्नानंतरचे पहिले केंद्र स्थान आहे. त्यामुळे ते अत्यंत शुभ आहे. या स्थानाला सुखस्थान म्हणतात. व्यक्तीला मिळणाऱ्या सौख्याचा विचार या स्थानावरून होत असतो. मातृसौख्य, पितृसौख्य, जमीन-जुमला, घरदार यांचा विचार या स्थानावरूनच करता येतो. शिक्षणाचा, समजूतदारपणाचा पहिला विचार ही या स्थानावरून होतो. स्वत:च्या कर्तव्याने घर मिळेल काय, वाहनसौख्य राहील काय, स्त्री-पुत्रादिकांचे सौख्य कसे राहील, या सर्व सुखोत्पादक प्रश्नांचा विचार ह्याच स्थानावरून होतो.। सुखस्थानम् गतोवापि पश्यन अपि गुरुर्यदि।। बहुसौख्यम् अवाप्नोति जातस् तंत्र न संशय: ।सुखस्थान व गुरूच्या संबंधी असलेला हा श्लोकच खरे तर, बलवान असा आहे. बलवान गुरूची सुखस्थानावर दृष्टी असली किंवा गुरु सुखस्थानात असला तर पुष्कळ सौख्य मिळते, असा या श्लोकाचा अर्थ आहे !
लग्नस्थान व लग्नेश यांवरून शरीर सौख्य, आरोग्य, दीर्घायुष्य पाहिले जाते. हे सर्व महत्त्वाचेच आहे. परंतु मनुष्य जन्मानंतर, तो कसा ही असला तरी, महत्त्वाचे राहते ते त्याला मिळणारे सौख्य ! तेच जर नसेल तर इतर कोणती ही बाब ही दुय्यमच ठरत असते. संपत्ती, बुद्धी, वर्क्तृत्व, भावंडे, पराक्रम, संतती, शत्रुपीडा, पती-पत्नी सौख्य, भाग्य, उद्योग धंदा, कर्ज या सर्व बाबी अत्यंत महत्त्वाच्या अशा असल्या तरी जर सौख्य स्थानच दुर्बळ असले, चतुर्थेशच पापग्रह युक्त, दृष्ट असेल तर वरील सर्व महत्त्वाच्या बाबीच एकूण दुय्यम बनून जातात. घरी नळ आहे पण पाणी नाही, बटन आहे पण वीज नाही आणि फ्रेम अज्ञाहीे पण त्यात फोटो नाही; तर काय स्थिती होईल ? नेमकी तीच स्थिती चतुर्थस्थान व चतुर्थेश दुर्बल असल्यावर होईल. आपण श्रीकृष्णाचीच कुंडली या साठी पाहू-

nagarsanket, kundli

लग्नेश शुक्र स्वगृहीचा उच्चीच्या शनीबरोबर आहे व चतुर्थात सिंह राशी असून चतुर्थेश रवि ही तेथेच आहे. श्रीकृष्णाच्या कुंडलीत चतुर्थस्थान व चतुर्थेश दोन्ही बलवान आहेत. यास्तव तो सर्व सुखांचा धनी बनला. दु:खांवर, संकटांवर मात करीत सुख घेत राहिला. अगदी बालपणापासून !
प्रसिद्ध दिवंगत चित्रपटकार राजकपूरच्या पत्रिकेत चतुर्थात तुळेचा शुक्र आहे, तर राजीव गांधींच्या पत्रिकेत चतुर्थेश मंगळ हा बुधाच्या राशीत द्वितीयात आहे. दोघांच्या जीवनातील फरक तुम्ही पहा ! अधिक सुखी कोण होता? अर्थात राजकपूरच ! इन्दिरा गांधींच्या पत्रिकेत चतुर्थेश शुक्र हा राहूसह षष्ठात होता, भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्रप्रसादांच्या कुंडलीत गुरु हा भाग्यात होता. वरील सर्व बाबींवरून चतुर्थस्थान व चतुर्थेश यांच्या विषयी निर्विवादपणे काही प्रमुख सूत्रे मांडता येतील. जवळ-जवळ पाचशे अभ्यास करून ही सूत्रे मी संशोधिली आहेत. त्यातील काही प्रमुख सूत्रे अशी-
१) चतुर्थस्थानी शुभग्रह असावेत.
२) चतुर्थस्थानी शुभग्रहांच्या राशी असाव्यात.
३) चतुर्थभावारंभ हा शुभ असला पाहिजे.४) चतुर्थेश केंद्र-त्रिकोणात असणे उत्तम असते.५) चतुर्थेश पाप ग्रहांच्या राशीत किंवा युतीत नको.
६) चतुर्थेश पंचमात अति उत्तम असतो, परंतु पंचमस्थानी पापग्रह किंवा त्यांची दृष्टी नको.
७) चतुर्थेश स्वगृहीचा किंवा उच्चीचा असला तर अनेक सौख्य जातकाला मिळतील !
ही सूत्रे लक्षात ठेवा आणि आता कोणाचीही कुंडली उघडून पहा. या पैकी जास्तीत जास्त नियम ज्या पत्रिकेत असतील, त्या प्रमाणात तो सुखी नक्की असेल !


 

स्त्रियांचा "राणीयोग'


आपण कैकवेळा असे पाहिले असेल की, एखाद्या उच्च घराण्याची स्त्री किंवा युवती त्याहून कमी दर्जाच्या पुरुषाशी किंवा युवकाशी लग्न करते किंवा एखाद्या सामान्य कुटुंबातील युवती विवाहानंतर अतिशय उच्च प्रकारचे ऐश्वर्य भोगते. आपणाला अशी अनेक उदाहरणे माहिती असतील की जी ऐकून आपण दोन्ही बाजूने आश्चर्यचकित होतो. दारिद्र्यात खितपत पडलेल्या स्त्रीला ऐश्वर्य का व कसे प्राप्त झाले ? आणि ऐश्वर्याची महान पार्श्वभूमी असलेल्या स्त्रीला दारिद्र्यात का व कसे खितपत पडावे लागते ? अशी कितीतरी उदाहरणे तुम्हांला नक्कीच माहिती असतील. हे असे का होते ? प्रश्न खूप नाजूक आहे ! उत्तर शोधणे त्याहून नाजूक आहे ! पण उत्तर तर शोधलेच पाहिजे ! प्रश्नच असा आहे की त्याची मीमांसा केली पाहिजे कारण त्या मीमांसेने आपली जिज्ञासा पूर्ण होते आणि आश्चर्याचा भाग कमी होतो व नियतीची उपस्थिती तीव्रतेने जाणवू लागते.तर ही नियती आहे, हे योगायोग आहेत किंवा हे भविष्य आहे ! त्या स्त्रीच्या भविष्यात ते तसे होते म्हणून ते तसे झाले. उंट बसून का राहिला ? कारण त्याला फिरवला नाही ! पंखा का गंजला ? कार त्याला फिरवला नाही ! आणि भाकरी का करपली ? कारण तिला फिरवली नाही ! प्रश्न वेगवेगळे आणि उत्तर एकच ! फिरवले नाही ! म्हणून उंट बसून राहिला, पंखा गंजला आणि भोकरी करपली अगदी असेच भविष्यशास्त्रात आहे ! प्रश्न तुमचे कितीही असे देत ! कोणतेही असू देत ! उत्तर एकच- भविष्य ! योगायोग ! नियती !
एखादी युवती न शिकता श्रीमंती कुळातील पुरुषाशी विवाह करते व राणीसारखे ऐश्वर्य भोगते, एखादी स्त्री प्राध्यापिका होते व एखाद्या स्त्रीला आजन्म वैधव्य प्राप्त होते ! हे असे का होते ? शेकडो स्त्रियांच्या कुंडल्यांचा अभ्यास केल्यानंतर मला असे आढळून आले की ज्या स्त्रीच्या पत्रिकेत राजयोग म्हणजे "राणीयोग' आहेत. त्या खूप सुखी आहेत, लौकिक ऐश्वर्य त्यांच्या पायाशी लोळण घेत आहेत व ज्या स्त्रियांच्या पत्रिकेत हे "राणीयोग' नाहीत, त्या स्त्रिया भौतिक सुखापासून वंचित राहिल्या आहेत. त्यांना आपल्या इच्छा-आकांक्षांना मुरड घालावी लागली आहे.
अनुभविक असे पंधरा सिद्धांत मी खाली देत आहे. कोणत्याही युवतीला किंवा स्त्रीला हे नियम सहज कळावेत अशा भाषेत ते दिले आहेत. यांपैकी किती सिद्धांत तुमच्या कुंडलीत आहेत, ते पहा म्हणजे तुम्ही या "राणीयोगा'त बसता किंवा नाही ते तुम्हांलाच सहज समजेल ! एक गोष्ट मात्र सांगावीशी वाटते ! स्त्रियांच्या बाबतीत कुंडलीचाच फक्त अभ्यास करून उपयोग नसतो,तर तिच्या "देहखुणा'ही त्या बाबतीत महत्त्वाच्या आहेत. अंगावरचे तीळ, नेत्र, उरोज, हात बोटांची ठेवण, पाय यांचीही लक्षणे याबाबतीत आभ्यासात आली पाहिजेत.
तर हे "राणीयोग'चे आनुभविक सिद्धांत-१) गुरू किंवा शुक्र बलवान असून सातव्या स्थानी असला पाहिजे. आणि दशमेश ९,११,१,४,५,१० किंवा दुसऱ्या स्थानी असला पाहिजे.
२) सातव्या स्थानी बुध, शुक्र व अकराव्या स्थानी चंद्र असला पाहिजे. सातव्या स्थानावर गुरूची दृष्टी पाहिजे.
३) लग्नात गुरू, सप्तमात चंद्र व दशमात शुक्र असला पाहिजे.
४) बलवान गुरू ग्रह १,४,७,१० यापैकी एकास्थानात चंद्राचे दृष्ट असला पाहिजे.
५) जन्मकुंडलीत केंद्रात शुभग्रह असावेत व ३।६।१० च्या स्थानांत पापग्रह असावेत व सातव्या स्थानी पुरुष राशी असावी.
६) कन्या लग्न कुंडलीत बुध लग्नात व गुरू एकादश भावात असला पाहिजे.
७) लग्नात शुक्र, तृतीयस्थानात बुध व चतुर्थस्थानात गुरू असला पाहिजे.
८) जन्मकुंडलीत कमीत कमी तीन ग्रह उच्चीचे असले पाहिजेत. चार किंवा पाच ग्रह उच्चीचे असले तर खूपच चांगला "राणीयोग'होतो.९) कर्क लग्न. सातव्या स्थानी चंद्र आणि केंद्रात पापग्रहाचा अभाव असला पाहिजे.
१०) उच्चीचा गुरू नवव्या, पाचव्या, पहिल्या, चौथ्या किंवा सातव्या स्थानी असला पाहिजे.
११) कुंभ लग्न असून चतुर्थातील चंद्र गुरू दुष्ट असला पाहिजे.
१२) मिथुन लग्नात, बुध व गुरू चतुर्थस्थानात आणि त्यावर शुक्राची दृष्टी असली पाहिजे. म्हणजेच शुक्र दशमात असला पाहिजे.
१३) अष्टमात मेषेचा सूर्य, लग्नात चंद्र आणि दशमस्थानात बुध असला पाहिजे.
१४) जन्मलग्न स्थिर राशीचे असून त्यात गुरू, मंगळ तिसऱ्या किंवा सहाव्यास्थानी आणि शनि दशमात असला पाहिजे.
१५) रवि तिसऱ्या स्थानात व शनि सहाव्या स्थानी स्थानी असला पाहिजे.
हे अनुभविक असे पंधरा सिद्धांत "राणीयोग' चे आहेत. यांपैकी एखादा जरी नियम तुमच्या कुंडलीत परिपूर्ण बसत असला, तर तुम्ही निश्चितच ऐश्वर्य उपभोगाल असे स्त्रियांना समजले पाहिजे. सर्व प्रकारचे सुखोपभोग त्या स्त्रीला मग मिळू शकतात. कारण ते एक विधिसंकेत असतो !

nagarsanket, kundli

माधुरी दीक्षित
जन्म : १५.५.१९६७ पहाटे ५.३२ मि.

राजकुमार मार्गारेट हिच्या पत्रिकेत सप्तमात शुक्र व दशमेत गुरू चतुर्थात आहे. (नियम पहिला) म्हणून ती राणीसारखी ऐश्वर्य भोगत आहे. एका महिला खासदाराच्या पत्रिकेत तीन ग्रह उच्चीचे आहेत. गुरू मिनेच अष्टमात, रवि मेषेचा भाग्यात व शुक्र वृषभेचा दशमात ! (नियम आठवा) यामुळे ती महिला, खासदार बनू शकली. त्या स्त्रीच्या पत्रिकेत केंद्रात शुभग्रह (शुक्र), सातव्यास्थानी पुरूषग्रहाशी कुंभ व सहाव्यास्थानी पापग्रह राहू आहे. (नियम पाचवा) स्व. इंदिरा गांधीच्या पत्रिकेत सप्तमात चंद्र आहे. (नियम नववा) परंतु लग्नात शनि असल्यामुळे त्यांना भौतिक सुखाबरोबर भौतिक दु:खेही भोगावी लागली. अमेरिकेच्या माजी राष्ट्रपतीची पत्नी श्रीमती जॅकेलीन केनेडी हिच्या पत्रिकेत गुरू व शुक्र सप्तमात व दशमेश रवि भाग्यस्थानात हा "राणीयोग' (नियम पहिला) आहे. त्यामुळेच तिला प्रचंड भौतिक ऐश्वर्य मिळाले; परंतु तिच्या पत्रिकेत भाग्येश चंद्र षष्ठस्थानात असल्याने केनेडीच्या निधनानंतर तिने जगाची पर्वा न करता आणखी एक ऐश्वर्यपतिशी लग्न केले व गडगंज संपत्तीची ती मालकीण होऊन बसली. अगदी अलीकडील स्त्रियांची उदाहरणे घ्यावयास म्हटली तर ती अशी घेता येईल- प्रसिद्ध सिने-अभिनेत्री सायरा बानो (दशमात शुक्र,रवि, बुध), वैजयंतीमाला (चतुर्थात शुक्र व चंद्र), आशा भोसले (लग्नात शुक्र), माधुरी दीक्षित (दशमात गुरू व चंद्र) माझ्या परिचयाची एक स्त्री आहे. जन्म गरीब घराण्यातील परंतु पत्रिकेत वृषभेचा शुक्र लग्नात ! त्यामुळे ती आज करोडपती व्यक्तीची पत्नी बनून राहिली आहे. माधुरी दीक्षितच पत्रिका मी येथे मुद्दामहून अभ्यासासाठी देत आहे. थोडक्यात वरील पंधरा योगांपैकी एखादा योग पूर्णांशाने असला किंवा अपूर्णतेने असला तरी त्या योगाचे फल मिळतेच, असे दिसून आले आहे.


Contact- Maharashtra Astrology Reserch Center

3767, Navipeth, Ahmednagar-414001. Tel. M.9422220280

Feedback-

www.jawaharmuthaprof.com