nagarsanket, nagar sanket, logo, art, sahity, book, news, paperअहमदनगर जिल्हा

 

डॉ. प्रकाश कांकरियाचा  पुन्हा
जागतिक विक्रम


नगर- अहमदनगर येथील साईसूर्य नेत्रसेवाचे संचालक डॉ. प्रकाश कांकरिया व डॉ. सुधा कांकरिया यांनी एका दिवसात १८२ लॅसीक लेसर नेत्रशस्त्रक्रिया करण्याचा जागतिक विक्रम ५ ऑगस्ट रोजी पूर्ण केला. डॉ. कांकरियांचा हा ९ वा शतकी उपक्रम आहे.
तरुणांना दृष्टीदोष चष्मा असल्यामुळे त्यांना सैन्यात जाणे, पायलट होणे, नेव्ही, पोलिसदल, औद्योगिक व्यवसाय व मुलींना विशेषत: लग्नासाठी मोठा अडथळा ठरतो आहे. नगरचे डॉ. प्रकाश कांकरिया हे मागील २२ वर्षांपासून या तरुणांसाठी दृष्टीदोष निर्मूलनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करून त्यांना त्यांच्या आयुष्यात हवी असलेली संधी मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. अंधत्व निर्मूलनाबरोबरच या तरुणांनाही दृष्टी देण्याचे कार्यही ते महत्त्वाचे समजतात.

 

अहमदनगर होणार जागतिक
पर्यटन स्थळ

ahmednagar fort, nagarsanket, fort, shirdi

अहमदनगर चा भुईकोट किल्ला पर्यटन दृष्ट्या विकसीत करण्यात येणार असून जागतिक पर्यटनाच्या संदर्भात तो एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकेल, अशा घडामोडी लवकरच होणार असल्याचे समजते. लष्कराची विविध कार्यालये असलेल्या या किल्ल्यात १९४२ ते १९४५ इतक्या दीर्घ काळी पं. नेहरू, मौलाना आजाद, आचार्य नरेंद्र देव, हरेकृष्ण मेहताब यांसह त्यावेळच्या संपूर्ण कॉंग्रेस वर्कींग कमेटीचे वास्तव्य होते. पर्यटन स्थळाचा विकास होण्यासाठी लष्कर व राज्य शासनात येणाऱ्या क्रांतिदिनी करार होणार असल्याचे खात्रीलायक कळते. लवकरच किल्ला विकासाचा मास्टर प्लॅन तयार करून केंद्र सरकारला सादर केला जाणार असल्याचे कळते.